आवडीचं गाणं न लावल्याने डोक्यात फोडली बाटली, एकाचा मृत्यू

वृत्तसंस्था
सोमवार, 2 जानेवारी 2017

नवी दिल्ली- नववर्षाच्या पार्टीमध्ये आपल्याला हवं ते गाणं लावलं नाही म्हणून एकाने स्वतःच्या डोक्यात बाटली फोडून घेतली. यामध्ये डोक्याला गंभीर इजा झाल्याने त्याचा मृत्यू झाला. 

दीपक टंडन असे मृत्युमुखी पडलेल्या तरुणाचे नाव आहे. तो लुधियाना येथून दोन मित्रांसोबत नववर्षारंभ साजरा करण्यासाठी दक्षिण दिल्लीमधील हौज खास व्हिलेज येथे आला होता. टंडन हा दारुच्या नशेत होता. आपल्या आवडीचं गाणं लावावं यासाठी त्याची तिथे भांडणं झाली. इतर लोक त्याला शांत करण्याचा प्रयत्न करीत होते, परंतु त्याने ऐकले नाही, आणि रागाच्या भरात त्याने स्वतःच्या डोक्यात बाटली फोडली, असे पोलिसांनी सांगितले. 

मात्र, 'हा प्रसंग घडला तेव्हा आम्ही तिथे नव्हतो,' असे त्याच्या मित्रांनी पोलिसांना सांगितले. 
हा प्रकार घडल्यावर सफदरजंग एनक्लेव्ह पोलिस ठाण्याच्या पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तेव्हा टंडन याने रुग्णालयात जाण्यास नकार दिला. अनेकांनी त्याला समजावल्यावर अखेर तो रुग्णालयात जाण्यास तयार झाला. मात्र, सफदरजंग रुग्णालयात उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. 
 याप्रकरणी पुढील तपास सुरू असून, आज (सोमवार) त्याचे शवविच्छेदन करण्यात येणार असून, त्यामध्ये मृत्युचे कारण स्पष्ट होईल. 
 
Web Title: Man Dies After Smashing Beer Bottle On His Head At South Delhi Pub