पैसे काढता न आल्याने तिने गमावले पतीला

वृत्तसंस्था
बुधवार, 14 डिसेंबर 2016

अलिगड- पतीवर उपचार करण्यासाठी बँकेतील पैसे योग्य वेळी मिळू न शकल्याने माझ्या पतीला प्राण गमवावे लागले आहेत, अशी तक्रार एका पत्नीने केली आहे.

अलिगड- पतीवर उपचार करण्यासाठी बँकेतील पैसे योग्य वेळी मिळू न शकल्याने माझ्या पतीला प्राण गमवावे लागले आहेत, अशी तक्रार एका पत्नीने केली आहे.

रुख्साना व त्यांच्या शेजारी राहणाऱयांनी पत्रकारांना दिलेल्या माहितीनुसार, 'शमीम (वय 45) हे गेल्या काही दिवसांपासून आजारी होते. ते रोजंदारीचे काम करत होते. परंतु, गेल्या काही दिवसांपासून ते घरीच होते. आठ वर्षाच्या मुलीने साठविलेल्या पैशांवर आतापर्यंत उपचार केले होते. परंतु, तेही पैसे संपले होते. औषधे आणण्यासाठी जवळ पैसेच शिल्लक राहिले नव्हते. गेल्या चार दिवसांपासून बँकेच्या रांगेत उभी राहिल्यानंतरही रिकाम्या हाताने घरी परतत होते. उपचाराअभावी शमीम यांना जीव गमवावा लागला आहे.'

दरम्यान, जिल्हा प्रशासनाने या प्रकरणाची दखल घेतली असून, चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी दोन लाख रुपयांची मदत जाहिर केली आहे.

Web Title: Man Dies After Wife Fails to Withdraw Money