बलात्कारानंतर त्याने तिला पेटवले; पण जीव गेला त्याचाच...

Man dies of burn injuries after women he allegedly raped, set him on fire clings at west bengal
Man dies of burn injuries after women he allegedly raped, set him on fire clings at west bengal

कोलकाता: युवकाने बलात्कार केल्यानंतर 35 वर्षीय महिलेच्या अंगावर रॉकेल ओतून पेटवून दिले. आगीच्या ज्वाळांनी वेढलेल्या महिलेने बलात्कार करणाऱयाला मिठी मारून धरली. यामुळे त्याचाच होरपळून मृत्यू झाला तर पीडीत महिला जखमी झाली आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पश्चिम बंगालमधील मालदा जिल्ह्यात ही घटना घडली आहे. पीडित महिला (वय 35) ही घटस्फोटीत आहे. घरामध्ये ती एकटी असताना एक युवक तिच्या घरामध्ये घुसला. त्याने तिच्यावर बलात्कार केला. बलात्कारानंतर या घटनेची वाच्यता न करण्याबाबत सांगितले. यावेळी दोघांमध्ये भांडण झाले. युवकाने घरातील रॉकेल महिलेच्या अंगावर ओतले व पेटवून दिले. महिला आगीच्या ज्वाळांनी वेढल्यामुळे तिने तत्काळ त्यालाच मिठी मारली. घराला आतून कडी व दोघेही आगीमध्ये वेढले असल्याने बाहेर पडता येत नव्हते. घरामधून मोठ्या प्रमाणात धूर येऊ लागल्यामुळे नागरिक घटनास्थळी धावले. पीडित महिलेने त्याला घट्ट कवटाळून धरले होते. नागरिकांनी दोघांना बाजूला करत रुग्णालयात दाखल केले. मात्र, बलात्कार करणाऱयाचा जागीच होरपळून मृत्यू झाला होता. महिलेवर उपचार सुरू आहेत.

पीडीत महिलेने उपचारादरम्यान पोलिसांना संबंधित माहिती दिली. शेजारी राहणाऱया नागरिकांनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार आरोपी पीडित महिलेच्या घरी नेहमी येत असे. परंतु, बलात्कार केल्यानंतर त्याने पेटवून दिल्यामुळे ही घटना घडल्याने पेटवणाऱ्या युवकालाच स्वतःच्या कर्माची शिक्षा मिळाल्याची चर्चा परिसरात रंगली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com