प्रेमात पडले, लग्न केलं अन् रेल्वेतून फेकलं...

वृत्तसंस्था
बुधवार, 31 जुलै 2019

एका अनोळखी क्रमांकावरून फोन आला. बोलणं झालं अन् त्याच्या प्रेमात पडली. दोघांनही काही दिवसातंच पळून जाऊन विवाह सुद्धा केला. पण...

बरेली: एका अनोळखी क्रमांकावरून फोन आला. बोलणं झालं अन् त्याच्या प्रेमात पडली. दोघांनही काही दिवसातंच पळून जाऊन विवाह सुद्धा केला. पण, विवाहाच्या दुसऱयाच दिवशी त्याने रेल्वेतून ढकलून दिले अन् स्वतःही उडी मारली. दोघेही जखमी झाले आहेत.

उत्तर प्रदेशमधील फेतहगंजमध्ये मंगळवारी (ता. 30) ही घटना घडली आहे. हिरा (वय 25) व बेबी (वय 18) या त्याच्या पत्नीला उपचारासाठी पोलिसांनी जिल्हा रुग्णालयाच्या आपातकालीन कक्षात दाखल केले आहे. मात्र, त्याने असे का केले, याबाबत माहिती मिळू शकली नाही. हिरा अद्यापही बेशुद्धावस्थेत आहे.

हिराची पत्नी शुद्धीवर आली असून, तिने पोलिसांना सांगितले की, 'गेल्या तीन महिन्यांपासून मला एका अज्ञात नंबरवरुन फोन येत होता. त्या व्यक्तीशी बोलायला सुरवात केल्यानंतर ओळख वाढत गेली. पुढे त्याच्या प्रेमात पडले. आम्ही दोघांनी विवाह करण्याचा निर्णय घेतला. 26 जुलै रोजी हिरा तीनसुकियामध्ये आला होता. आम्ही दोघे पाटणा येथे पळून गेलो. दोन दिवस एका हॉटेलमध्ये राहिल्यानंतर 29 जुलै रोजी मंदिरात जाऊन विवाह केला. मंगळवारी मोरादाबाद येथे जाणारी रेल्वे आम्ही पकडली. रेल्वेने बरेली सोडल्यानंतर हिराने मला रेल्वेच्या बाहेर फेकून दिले. त्यानेही रेल्वेतून उडी मारली. पण, त्याने असे का केले, हे समजत नाही.'

दरम्यान, फतेहगंज (पश्चिम) पोलिस स्टेशनच्या हद्दीतील रेल्वे रुळावर बेबी आणि हिरा दोघेही बेशुद्ध अवस्थेत सापडले होते. दोघांना उपचासाठी रुग्णालयात दाखल केले आहे. रेल्वे पोलिसांना या प्रकरणाची चौकशी करण्यास सांगितली आहे, अशी माहिती पोलिस अधीक्षक अभिनंदन सिंह यांनी दिली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: man elopes marries girl and then throws her off speeding train at up