तुटलेला पाय घेऊन रेल्वे प्लॅटफॉर्मवर चढली व्यक्ती!

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 22 जून 2018

प्लॅटफॉर्मवरील सगळी गर्दी त्या व्यक्तीच्या दिशेने धावली पण त्या व्यक्तीस मदत करण्यासाठी नव्हे तर झालेल्या अपघाताचा व्हिडीओ काढण्यासाठी.

हरियाणा - पाय तुटलेल्या माणसाला मदत करायची सोडून आजूबाजूचे लोक त्याचा व्हिडीओ काढत बसले. शेवटी आपला तुटलेला पाय घेऊन ती व्यक्तीच प्लॅटफॉर्मवर चढली. ही घटना आहे हरियाणा येथील. 

हरियाणाच्या भिवानी रेल्वे स्थानकावर रेल्वेत चढताना एका व्यक्तीचा तोल जाऊन ते प्लॅटफॉर्मवर पडले. या अपघातात दुर्दैवाने त्या व्यक्तीचा पाय कापला गेला. प्लॅटफॉर्मवरील सगळी गर्दी त्या व्यक्तीच्या दिशेने धावली पण त्या व्यक्तीस मदत करण्यासाठी नव्हे तर झालेल्या अपघाताचा व्हिडीओ काढण्यासाठी. ही घटना 17 जूनला घडली आहे. पण या घटनेचा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल होत असल्याने ही घडना पुढे आली. 

अपघात झालेल्या व्यक्तीचे नाव कृष्ण कुमार आहे. ते आपल्या पत्नी सोबत हिसारला जाण्यासाठी प्रवास करत होते. पाणी आणण्यासाठी ते भिवानीला उतरले आणि पुन्हा रेल्वेत चढताना पाय घसरल्याने हा दुर्दैवी अपघात झाला. मदतीला कुणीही पुढे येत नसल्याने कृष्ण कुमार यांनी स्वतःच आपला तुटलेला पाय उचलला आणि प्लॅटफॉर्मवर चढले. त्या प्लॅटफॉर्मवर पोलिस देखील उपस्थित होते पण सामान्यांसारखच पोलिसांनीही त्यांना मदत केली नाही. लोक कृष्ण यांचा व्हिडीओ काढण्यात गुंग होते. त्यांना हिसार येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.    

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Web Title: man feet cuts under train in bhiwani and people were busy in capturing video