मित्रांना बलात्कारासाठी बापाने दिली स्वतःची मुलगी

वृत्तसंस्था
गुरुवार, 19 एप्रिल 2018

लखनौ (उत्तर प्रदेश): मित्रांना बलात्कार करण्यासाठी भेट वस्तू (गिफ्ट) म्हणून स्वतःची मुलगी दिल्याचा अत्यंत धक्कादायक प्रकार सीतापूर जिल्ह्यात घडला आहे. माणुसकीला काळीमा फासणाऱया या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी बापाचं वय 50 वर्ष आहे. रविवारी (ता. 15) तो कमालपूर येथील एका जत्रेत मित्रांसोबत गेला होता. संध्याकाळी तेथून परतल्यानंतर आपला मित्र मान सिंह याला त्याने घरी बोलावले. घरी आल्यावर आरोपी बापाने आपल्या मुलीला (वय 35) मान सिंह याच्यासोबत दुचाकीवरून जाण्यास सांगितले. मान सिंह तिला घेऊन दुसरा मित्र मेराज याच्या घरी गेला. बापही मेराजच्या घरी पोहचल्यानंतर मित्रांना भेट वस्तू म्हणून बलात्कार करण्यासाठी मुलीला मित्रांकडे सोपवले. तिघांनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. अठरा तासानंतर सोमवारी (ता. 16) सांयकाळी पीडित मुलीची सुटका करण्यात आली. घरी परतल्यावर तिने झालेला सर्व प्रकार आपल्या आईला सांगितला, त्यानंतर दोघींनी पोलिस स्थानकात जाऊन तक्रार दाखल केली.

दरम्यान, पोलिसांकडे तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तीनपैकी एकाला अटक केली. अन्य दोन फरार झाले असून, पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.

Web Title: UP man gifts daughter to friends, joins gangrape