पत्नी पोलिस, नवऱयाचं लफडं अन् प्रेयसी चोर...

वृत्तसंस्था
सोमवार, 15 जुलै 2019

पत्नी पोलिस दलात कार्यरत तर तिच्या नवऱयाचं लफडं. विशेष म्हणजे नवऱयाची प्रेयसी चोर निघाली.

इंदूर: पत्नी पोलिस दलात कार्यरत तर तिच्या नवऱयाचं लफडं. विशेष म्हणजे नवऱयाची प्रेयसी चोर निघाली. पोलिसांनी दोघांना बेड्या ठोकल्या असून, या वृत्तामुळे मध्य प्रदेशात खळबळ उडाली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रियकराची पत्नी पोलिस दलात कार्यरत आहे. त्याने पत्नीचा गणवेशाची चोरी करून प्रेयसीला दिला होता. त्याची प्रेयसी गणवेश घालून अनेकांना लुटत होती. याप्रकरणाची माहिती समोर आल्यानंतर प्रियकर व प्रेयसीला अटक करण्यात आली आहे. दोघांकडून पोलिसांची खोटी ओळखपत्र ताब्यात घेण्यात आली असून, पुढील तपास सुरू आहे.

पत्नी पोलिस दलात कार्यरत असलेल्या पतीचे अनैतीक संबंध होते. प्रियकराने पत्नीच्या गणवेशाची चोरी करून प्रेयसीला दिला. प्रेयसी पोलिस अधिकारी असल्याचे भासवून अनेकांना लुटत होती. याबाबतच्या तक्रारी आल्यानंतर पोलिसांनी चौकशी सुरू केली. तपासादरम्यान प्रियकर व प्रेयसीचा प्रताप उघड झाला. पत्नी पोलिस, नवऱयाचं लफडं अन् प्रेयसी चोर... यावर मध्य प्रदेशात जोरदार चर्चा सुरू आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Man gives wifes police uniform to girlfriend to loot people, both held at mp