विमान कंपनीने केली नाही मदत, मग अभियंत्याकडून इंडिगोची वेबसाईट हॅक | Indigo Airlines | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Indigo Airlines News

विमान कंपनीने केली नाही मदत, मग अभियंत्याकडून इंडिगोची वेबसाईट हॅक

नवी दिल्ली : विमानतळावर सामान गायब झाल्याने नाराज बंगळूरुच्या एका व्यक्तीने विमान कंपनी इंडिगोची वेबसाईट हॅक केली. नंदन कुमार हे पाटणाहून बंगळूरुला इंडिगोने गेले होते. बंगळूरु विमानतळावर त्यांचे सामान दुसऱ्या एका प्रवाशाच्या सामानाबरोबर अदलाबदली झाली. कुमार यांनी इंडिगोच्या (Indigo) कस्टमर केअर सर्व्हिसशी संपर्क साधला. मात्र इंडिगो कस्टमर केअर सर्व्हिसने त्या व्यक्तीशी त्यांचा संपर्क करुन दिला नाही. नंदन कुमार यांनी सांगितल्यानुसार, कस्टमर केअर (Customer Care) सर्व्हिसशी अनेकदा संपर्क केल्यानंतर शेवटी इंडिगो कस्टमर केअर सेंटरने ज्या व्यक्तीने त्यांचे सामान नेले, त्याच्याशी संपर्क साधून दिला जाईल, असे आश्वासन दिले. (Man Hacks Airlines Company Indigo Website For Find His Lost Luggage)

हेही वाचा: जीवाची परवा न करता बहिणीला वाचवले, पण... कमावत्या भावाचा गेला जीव

मात्र त्यानंतर इंडिगोने शब्द पाळला नाही. त्यानंतर नंदन कुमार यांनी वेगळे पाऊल टाकले. त्यांनी संगणकाचे हॅकर मोड ऑन केले आणि शेवटी वेबसाईटवर त्या प्रवाशाचा नंबर शोधून काढला. नंदन कुमार यांनी या घडलेल्या प्रकाराविषयी ट्विटरवर माहिती शेअर केली आहे. इंडिगोच्या वतीनेही ट्विटरवर नंदन कुमार यांना उत्तर दिले आहे. त्यात कंपनीने कुमार यांना झालेल्या गैरसोयीसाठी त्यांच्याकडे माफी मागितली आहे.

हेही वाचा: आमदार, गृहनिर्माण मंत्रिपद भूषवूनही मुंबईत घर नाही; चंद्रकांत खैरेंची खंत

दुसरीकडे इंडिगोने सांगितले, की त्यांची वेबसाईट सुरक्षिततेच्या दृष्टीने सर्वोत्तम आहे. या सर्व घटनेवर सोशल मीडियावर लोकांनी प्रतिक्रिया नोंदविल्या आहेत. एक यूजर लिहितो, ते इंजिनिअर आहेत, काहीही करु शकतात. दुसरा युजर म्हणाला, डेव्हलपरच्या ताकदीला कधीही कमी लेखू नका.

Web Title: Man Hacks Airlines Company Indigo Website For Find His Lost Luggage

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..