The Kerla Story पाहिला अन् तिने गाठलं पोलिस स्टेशन; बलात्कार, धर्मांतरासाठी दबाव आणल्याचा तरुणावर आरोप | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Crime

The Kerla Story पाहिला अन् तिने गाठलं पोलिस स्टेशन; बलात्कार, धर्मांतरासाठी दबाव आणल्याचा तरुणावर आरोप

भोपाळ : मध्यप्रदेशमध्ये एका तरूणीवर बलात्कार केल्याप्रकरणी आणि जबरदस्ती धर्मांतर करण्यासाठी दबाव आणल्याप्रकरणी तरूणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. "द केरला स्टोरी" हा चित्रपट पाहिल्यानंतर तरूणीने तिच्या प्रियकराच्या विरोधात तक्रार दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हा 12वी पास असून बेरोजगार आहे तर पीडित मुलगी उच्च शिक्षित असून एका खाजगी कंपनीत नोकरीला आहे. चार वर्षांपूर्वी एका कोचिंग इन्स्टिट्यूटमध्ये शिकत असताना महिलेची त्या व्यक्तीशी भेट झाली होती.

त्यानंतर त्यांच्या मैत्री झाली आणि त्यानंतर ते लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहू लागले होते. तरूणीने तक्रारीत सांगितले की, ते नुकतेच "द केरला स्टोरी" हा चित्रपट पाहण्यासाठी गेले होते. चित्रपट पाहून आल्यानंतर त्यांच्यामध्ये वाद झाले.

चित्रपट पाहून आल्यानंतर त्यांच्यामध्ये कडाक्याचे भांडण झाले आणि तरूणीने थेट पोलीस स्टेशन गाठले. तरूणीने तरूणाविरोधात तक्रार दाखल केली असून पोलिसांकडून सदर तरूणाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या तरूणाने तरूणीला बळजबरी धर्मांतर करण्यासाठी दबाव आणला होता. त्याचबरोबर तिच्यावर बलात्कारही केला असल्याचा आरोप तरूणीने तक्रारीत केला आहे.

टॅग्स :policecrimerape news