बनावट नोटेद्वारे दारू खरेदी करणारा अटकेत

वृत्तसंस्था
बुधवार, 16 नोव्हेंबर 2016

जयपूर- बनावट नोटेद्वारे दारू खरेदी करण्याचा प्रयत्न करणाऱया एका ज्येष्ठ नागरिकाला अटक करण्यात आली आहे, अशी माहिती पोलिसांनी आज (बुधवार) दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, झुंजझूंनू जिल्ह्यातील छिरवा गावामध्ये दोन हजार रुपयांची बनावट नोट देऊन दारूची खरेदी करण्याचा प्रयत्न करणाऱया लाल सिंग (वय 60) नावाच्या व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. दोन हजार रुपयांच्या नोटेची कलर झेरॉक्स मारण्यात आल्याची माहिती चौकशीदरम्यान पुढे आली आहे. याबाबत पुढील तपास सुरू आहे.

दारू विक्रेत्याने सांगितले की, लाल सिंग नावाची व्यक्ती दोन हजार रुपयांची बनावट नोट घेऊन दुकानात आला होता. खरी नोट असल्याचे सांगून त्याने दारू मागितली. परंतु, या नोटेबाबत शंका निर्माण झाल्याने पोलिसांना कळविले.

Web Title: man held for bid to buy wine with photocopy note

टॅग्स