कुत्र्यासोबत संभोग करण्यासाठी पत्नीवर दबाव

वृत्तसंस्था
मंगळवार, 28 मार्च 2017

बंगळूर- पत्नीला कुत्र्यासोबत संभोग करण्यासाठी दबाव आणणाऱया पतीला अटक करण्यात आली आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.

गेल्या चार महिन्यांपासून अत्याचाराला सामोरे जाणाऱया पत्नीने कताकोल पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. पत्नीच्या तक्रारीनंतर पतीला अटक करण्यात आली आहे.

पंचवीस वर्षीय पत्नीने तक्रारीत म्हटले आहे की, 'ट्रक चालक असलेला पती मोबाईलवरू अश्लिल व्हिडिओ व छायाचित्रे दाखवत असे. व्हिडिओ पाहून झाल्यानंतर पती कुत्र्यासोबत संभोग करण्यासाठी माझ्यावर दबाव आणत होता. गेल्या चार महिन्यांपासून हा प्रकार सुरू होता. यानंतर आमच्यात भांडणेसुद्धा होत होती. भांडणानंतर पती मला घराबाहेर काढत असे.'

'22 मार्च रोजी संध्याकाळी साडेदहाच्या सुमारास पतीने कुत्र्यासोबत संभोग करण्यास सांगितले. माझ्या सोबत रहायचे असेल तर संभोग करावा लागेल, असे म्हटल्यानंतर आमच्यात पुन्हा भांडणे झाली. भांडणानंतर पतीने मला व तीन मुलांना घराबाहेर काढले. पतीच्या छळाला कंटाळल्यामुळे तक्रार दाखल करावी लागली,' असे पीडित महिलेने म्हटले आहे.

दरम्यान, पोलिसांनी पतीला अटक केली असून, न्यायालयाने त्याला न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

Web Title: Man held for forcing wife to have sex with dog