हॅलो, जावई बोलतोय; मेव्हणीवर बलात्कार केलाय....

वृत्तसंस्था
गुरुवार, 1 ऑगस्ट 2019

हॅलो, सासूबाई... जावई बोलतोय. बायकोला धडा शिकवण्यासाठी मेव्हणीवर बलात्कार केलाय, असे जावयाने सासूला फोनवरून सांगितले.

हैद्राबादः हॅलो, सासूबाई... जावई बोलतोय. बायकोला धडा शिकवण्यासाठी मेव्हणीवर बलात्कार केलाय, असे जावयाने सासूला फोनवरून सांगितले. केवळ साडेतीन वर्षांच्या मेव्हणीवर बलात्कार केल्याची घटना येथे घडली असून, संशयित आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

हैदराबादमधील मैलारदेवपल्ली पोलिस स्थानकाअंतर्गात ही घटना घडली असून, याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दुसऱयाच दिवशी पोलिसांनी आरोपीला (वय 25) त्याच्या घरामधून अटक केली आहे. पत्नी नांदायला येत नसल्यामुळे तिला धडा शिकवण्यासाठी आपण हे कृत्य केल्याचे त्याने पोलिसांना सांगितले. पुढील तपास करत आहेत.

शमशाबाद येथील पोलीस उपायुक्त प्रकाश रेड्डी यांनी दिलेल्या माहितीनुसार, 'पीडित कुटुंब मूळ बिहारचे रहिवासी असून, येथे ते मजुरीचे काम करत आहे. संशयित आरोपी सुद्धा बिहारचा आहे. तीन वर्षांपूर्वी त्याचा विवाह झाला होता. दारूच्या व्यसनामुळे पत्नी कंटाळून आई-वडिलांकडे राहायला आली होती. पीडित मुलीचे आई-वडील काम करण्यासाठी घराबाहेर गेले होते. मुलीचा सांभाळ करण्यासाठी त्यांनी दुसऱ्यांकडे दिले होते. मुलीचा सांभाळ करणाऱे जावयाला ओळखत होते. जावई आल्यानंतर त्याने मेव्हणीला आपल्या ताब्यात घेतले. तिला घेऊन चंद्रायनगुट्टा येथील एका निर्जन स्थळी गेला. दारुच्या नशेत त्याने मुलीवर बलात्कार केला. मुलीचे पालक संध्याकाळी घरी आल्यानंतर त्यांनी शोध सुरू केला. रात्री 9 च्या सुमारास आरोपीने मुलीला घराजवळ सोडले. शिवाय, सासूला फोन करून आपण हे कृत्य केल्याचे सांगितले.'

पीडित मुलीच्या कुटुंबियांनी या घटनेनंतर पोलिसांकडे तक्रार दाखल केली. पोलिसांनी चिमुकलीला वैद्यकीय तपासणीसाठी पाठवले आहे. दुसऱ्या दिवशी आरोपीला पोलिसांनी त्याच्या घरातूनच ताब्यात घेतले असून, आरोपीविरोधात ‘पॉक्सो’अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Man held for rape of wifes three year old sister at hyderabad