दिल्ली मेट्रोसमोर उडी मारुन आत्महत्या

वृत्तसंस्था
सोमवार, 20 मार्च 2017

ईश्‍वर प्रसाद यांनी कार्यालयीन तणावामुळे ही आत्महत्या केल्याचे निदर्शनास आले आहे. ते काम करत असलेल्या एका गॅस कंपनीच्या मालकाशी त्यांचे मतभेद झाल्याचे आढळून आले आहे

नवी दिल्ली - दिल्लीमधील आझादपूर मेट्रो रेल्वे स्थानकामध्ये येणाऱ्या मेट्रोसमोर उडी मारुन एका 50 वर्षीय नागरिकाने आत्महत्या केली. या नागरिकाचे नाव ईश्‍वर प्रसाद असे असून ही घटना आज (सोमवार) सकाळी घडली. प्रसाद यांना तातडीने नजीकच्या रुग्णालयात उपचारार्थ नेण्यात आले. मात्र तेथे डॉक्‍टरांनी त्यांना मृत घोषित केले.

ईश्‍वर प्रसाद यांनी कार्यालयीन तणावामुळे ही आत्महत्या केल्याचे निदर्शनास आले आहे. ते काम करत असलेल्या एका गॅस कंपनीच्या मालकाशी त्यांचे मतभेद झाल्याचे आढळून आले आहे. ईश्‍वर प्रसाद यांच्या मृतदेहाबरोबर "सुसाईड नोट'ही आढळली आहे.

दरम्यान, त्यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी नेण्यात आला आहे. या प्रकरणी अधिक माहितीची अद्यापी प्रतीक्षा आहे.

Web Title: Man jumps in front of Delhi Metro to end life