अस्वलासोबत सेल्फीच्या मोहात गमावला जीव

वृत्तसंस्था
गुरुवार, 3 मे 2018

भुवनेश्वर (ओरिसा): एका जखमी अस्वलासोबत सेल्फी घेत असताना अचानक अस्वलाने केलेल्या हल्ल्यात एकाला जीव गमवावा लागल्याची घटना नबारंगपूर जिल्ह्यात बुधवारी (ता. 2) सायंकाळी घडली, अशी माहिती वन अधिकाऱयांनी आज (गुरुवार) दिली.

वन अधिकाऱयांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रभू भात्रा हे आपल्या मित्रांसोबत चार चाकी वाहनातून एका विवाहाला उपस्थित राहण्यासाठी निघाले होते. प्रवासादरम्यान त्यांना एक जखमी अस्वल दिसले. रस्त्याच्या बाजूला वाहन थांबवून प्रभू अस्वलासोबत सेल्फी घेण्याचा प्रयत्न करत होते. यावेळी अचानक अस्वलाने प्रभू यांच्यावर हल्ला चढविला. अस्वलापासून प्रभू यांना दूर करण्यासाठी मित्रांनी प्रयत्न केला. परंतु, मित्रांचा प्रयत्न कमी पडला आणि अस्वलाच्या हल्ल्यात प्रभू यांचा जागीच मृत्यू झाला.

प्रभू यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यासाठी वन विभागाने त्यांच्या कुटुंबियांना 30 हजार रुपये दिले आहेत. पुढील रक्कम पंधरा दिवसांमध्ये दिली जाणार आहे, असे वन अधिकाऱयांनी सांगितले.

दरम्यान, महिनाभरामध्ये विविध ठिकाणी अस्वलाने केलेल्या हल्ल्यात तीन जणांचा मृत्यू आणि सहा जण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये दोन वन अधिकाऱयांचा समावेश आहे.

Web Title: Man killed trying to click selfie with bear