उत्तर प्रदेशात 'त्याने' उघडली बॅंकेची बनावट शाखा

वृत्तसंस्था
गुरुवार, 29 मार्च 2018

वाराणसी (उत्तर प्रदेश): बलिया जिल्ह्यातील मुलायम नगर येथील फेफ्ना भागामध्ये एकाने कर्नाटक बॅंकेची बनावट शाखा उघडली होती. पोलिसांनी 1.37 लाख रुपयांच्या रोख रक्कमेसह एकाला अटक केली आहे.

वाराणसी (उत्तर प्रदेश): बलिया जिल्ह्यातील मुलायम नगर येथील फेफ्ना भागामध्ये एकाने कर्नाटक बॅंकेची बनावट शाखा उघडली होती. पोलिसांनी 1.37 लाख रुपयांच्या रोख रक्कमेसह एकाला अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आफाक अहमद याला 1.37 लाख रुपयांच्या रोख रक्कमेसह अटक करण्यात आली आहे. त्याने कर्नाटक बॅंकेची बनावट शाखा उघडली होती. बॅंकेचा व्यवस्थापक म्हणून तो विनोद कुमार कांबळे (रा. पश्चिम मुंबई) या नावाने काम पहात होता. स्थानिक 15 नागरिकांनी बॅंकेत खाते उघडले होते. शिवाय, जमा ठेव सुद्ध ठेवली होती. बनावट बॅंकेमध्ये पास बूक, संगणक, लॅपटॉप, विविध फॉर्म्स व इतर साहित्य आढळून आले असून ते जप्त करण्यात आले आहे.

कर्नाटक बॅंकेची बनावट शाखेबद्दल माहिती मिळाल्यानंतर वाराणसी येथील बॅंकेचे अतिरिक्त व्यवस्थापक हितेंद्र कृष्णा यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिस पुढील तपास करत आहेत.

Web Title: man opens fake branch of Karnataka Bank in ballia uttar pradesh