उपचाराच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर बलात्कार

वृत्तसंस्था
मंगळवार, 7 मार्च 2017

सोमवारी पीडित मुलीच्या आईला प्रार्थनेसाठी मुलीसोबत येणे शक्‍य नव्हते. त्यामुळे अहमदने मुलीला एकटीला पाठविण्यास सांगितले. या संधीचा फायदा घेत अहमदने पीडित मुलीवर अत्याचार केले. याबाबत बहादूरपुरा पोलिस स्थानकातील निरीक्षक गुरू नायडू यांनी माहिती दिली.

हैदराबाद - स्वत:ला अध्यात्मिक गुरु म्हणवून घेणाऱ्या सय्यद अहमद (वय 45) नावाच्या एका ट्रक ड्रायव्हरने एका किशोरवयीन मुलीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

पीडित मुलगी आजारी असल्याने तिच्या आईने तिला अहमदकडे उपचारासाठी आणले. प्रार्थनेच्या माध्यमातून पीडित मुलीची तब्येत सुधारण्यासाठी अहमदने आठवडाभर प्रार्थना करण्याचा सल्ला दिला. त्याप्रमाणे शुक्रवारपासून प्रार्थनेला सुरुवात करण्यात आली. सोमवारी पीडित मुलीच्या आईला प्रार्थनेसाठी मुलीसोबत येणे शक्‍य नव्हते. त्यामुळे अहमदने मुलीला एकटीला पाठविण्यास सांगितले. या संधीचा फायदा घेत अहमदने पीडित मुलीवर अत्याचार केले. याबाबत बहादूरपुरा पोलिस स्थानकातील निरीक्षक गुरू नायडू यांनी माहिती दिली.

पीडित मुलीच्या आईने अहमदविरुद्ध पोलिसांत तक्रार केली आहे. प्रार्थनेच्या माध्यमातून आरोग्याच्या तक्रारींवर उपाय सुचवत असल्याचा दावा अहमद करत होता. त्याच्यावर पॉस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. "आम्ही तपास करत आहोत. अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेले नाही', अशी माहिती पोलिसांनी दिली.

Web Title: Man rapes minor girl after offering to cure her through prayers