बलात्कार झालेल्या मुलीसोबत पत्नीनेच लावून दिला विवाह

man rapes minor girl, wife gets them married at Karnataka
man rapes minor girl, wife gets them married at Karnataka

बंगळूरूः रंगकाम करणाऱया एका कामगाराने अल्पवयीन मुलीवर बलात्कार केला. याबाबतची माहिती त्याच्या पत्नीला समजल्यानंतर तिने दोघांचा विवाह लावून दिल्याची घटना कोलार जिल्ह्यात घडली. पीडित मुलीच्या वडिलांनी केलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी आरोपीला आणि त्याच्या पत्नीला अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गंगाराजू (वय 32) हा रंगकाम करतो. गावातील पल्लवी (वय 23) हिच्याशी त्याची मैत्री होती. पल्लवी पतीपासून विभक्त झाली होती. पुढे दोघांचे प्रेमसंबंध जुळले. दोन महिन्यांपूर्वी दोघांनी विवाह केला. विवाहनंतर ते हुनासीकोट येथे राहत होते. पल्लवीची 13 वर्षीय चुलत बहिण त्यांच्याकडे राहण्यासाठी आली होती. गंगाराजू याने तिच्यावर बलात्कार केला आणि कुठेही वाच्यता न करण्याची धमकी दिली. पण संपूर्ण गावात ही बातमी पसरली आणि चाइल्ड हेल्पलाइनला कळवण्यात आले. पल्लवी हिने गंगाराजूला वाचविण्यासाठी दोघांचा विवाह लावून दिला.

पीडित मुलीची चौकशी करण्यात आली असता तिेने असे काहीच झाले नसल्याचं सांगितले. पुन्हा एकदा पीडित मुलीकडे चौकशी केली असता तिने संपूर्ण घटनेची सविस्तर माहिती दिली. मुलीच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी आरोपी गंगाराम आणि त्याची पत्नी पल्लवीला अटक केली असून, पुढील तपास करत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com