मोबाईल विकल्यावर प्रेयसीसोबतचे फोटो डिलीट करायला विसरला अन्...

मोबाईल विकल्यावर प्रेयसीसोबतचे फोटो डिलीट करायला विसरला अन्...

मेरठ : मेरठमध्ये राहणाऱ्या एका व्यक्तीने मोबाईल विकताना माजी प्रेयसीसोबतचे फोटो डिलीट न करताच त्याचा फोन विकला. त्यानंतर धक्कादायक घटनांची मालिकाच सुरु झाली. मोबाइलमधल्या त्या फोटोंमुळे फोटोंमुळे शनिवारी मुझफ्फरनगरमध्ये एका 35 वर्षीय विवाहित महिलेने पाच वर्षाच्या मुलासोबत पूलावरुन नदीत उडी मारली. यामध्ये महिलेचा मृत्यू झाला पण पाच वर्षाच्या मुलाला वाचवण्यात यश आले. या फोटोंमुळे मेरठमध्ये रहाणाऱ्या या महिलेच्या सुखी वैवाहिक आयुष्यात वादळ आले.

आत्महत्या करणाऱ्या महिलेचे पूर्व प्रियकरासोबतचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. महिलेचा पूर्वप्रियकर शुभम कुमारने फोटो डिलीट केल्याशिवाय त्याचा फोन मेरठमध्ये रहाणाऱ्या अनुज प्रजापतीला विकला. शुभम कुमारने हा फोन विकताना त्यातील फोटो डिलीट केले नव्हते. त्यामुळे हे फोटो व्हायरल झाले. आत्महत्येचे टोकाचे पाऊल उचलण्याआधी या महिलेने एका टपरीवाल्याच्या मोबाइलवरुन फोन केला होता. तपासामध्ये हा फोन नंबर मेरठमध्ये रहाणाऱ्या तिच्या नवऱ्याचा असल्याचे समोर आले. त्यावरुन तिची ओळख पटली.

अनुज प्रजापतीने व्हायरल केलेल्या फोटोमध्ये जी महिला होती त्याच महिलेने आत्महत्या केली असे मेरठचे एसपी अखिलेश नारायण सिंह यांनी सांगितले आहे. त्यानंतर प्रजापतीचा सुद्धा मृत्यू झाला. फोटो व्हायरल केल्याच्या रागातून शुभम आणि त्याच्या मित्रानी 23 मे रोजी मेरठच्या कानकेरखेरा भागात अनुजची हत्या केली. महिलेला जेव्हा हे फोटो व्हायरल झाल्याचे समजले तेव्हा तिने शुभमला फोन करुन आपला राग व्यक्त केला.

त्यानंतर शुभमने अनुजची हत्या केली. सीसीटीव्ही फुटेज आणि मोबाइल फोनवरुन मेरठ पोलिसांनी अनुज प्रजापतीच्या मारेकऱ्यांचा शोध सुरु केला. सहारनपूर पोलिसांनी चकमकीनंतर संशयितांना बेडया ठोकल्या. दोन बाईकवरुन पळणाऱ्या पाचजणांनी पोलिसांवर गोळीबार केला. पोलिसांनी प्रत्युत्तरादाखल केलेल्या गोळीबारात दोन जण जखमी झाले. त्यानंतर पोलिसांनी आरोपींना अटक केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com