Video: पोलिसांनी दंड केल्यामुळे दुचाकीच पेटवली...

man sets bike on fire after he was challaned for drunk driving in delhi
man sets bike on fire after he was challaned for drunk driving in delhi

नवी दिल्लीः एका व्यक्तीला पोलिसांनी थांबवल्यानंतर नवीन नियमानुसार दंड केला. कागदपत्र दाखवतो असे म्हणून तो दुचाकीवरून उतरला अन् पोलिसांसमोरच दुचाकी पेटवून दिली. संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

देशातील रस्ते अपघातांचे वाढते प्रमाण रोखण्यासाठी केंद्र सरकारने वाहतूक नियमांचा भंग करणाऱ्यांकडून वसूल केल्या जाणाऱ्या दंडाच्या रकमेत पाच ते दहा पटीने वाढ केली आहे. त्यामध्ये अल्पवयीन मुला-मुलींकडून वाहन चालविताना गुन्हा घडल्यास वाहनमालक-पालकांना 25 हजार रुपयांचा दंड व तीन वर्षे तुरुंगवास होणार आहे. तसेच रुग्णवाहिकांना मार्ग न दिल्यास वाहनचालकांना 10 हजार रुपये दंड होणार आहे. या बदलाची अंमलबजावणी 1 सप्टेंबरपासून लागू करण्यात आली आहे.

दिल्लीतील एका व्यक्तीला पोलिसांनी नव्या नियमांनुसार दंड केला. संतापलेल्या दुचाकीस्वाराने दुचाकीला पोलिसांसमोरच आग लावली. दिल्लीतील शेख सराई परिसरात बुधवारी (ता. 4) संध्याकाळच्या सुमारास हा प्रकार घडला. घडलेला हा प्रकार पाहून पोलिस हवलदारही गोंधळले. त्यांनी तत्काळ अग्निशामन दलाला याबाबतची माहिती दिली. अग्निशामन दलाची गाडी घटनास्थळी दाखल झाली आणि त्यांनी आग आटोक्यात आणली. पोलिसांनी या व्यक्तीला ताब्यात घेतले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 'संबंधित चालक दारूच्या नशेत वाहन चालवत होता. दुचाकी बाजूला घेण्यास सांगितल्यानंतर त्याच्याकडे कागदपत्रांची मागणी केली. दुचाकीवरून उतरल्यानंतर त्याने दुचाकी पेटवून दिली. याबाबत पुढील तपास सुरू आहे.'

नियमभंग : जुना दंड : नवा दंड (आकडे रुपयांत)

  • रस्ते नियमांचा भंग : 100 : 500
  • प्रशासनाचा आदेश भंग : 500 : 2000
  • परवाना नसताना वाहन चालविणे : 500 : 5000
  • पात्र नसताना वाहन चालविणे : 500 : 10,000
  • वेग मर्यादा तोडणे : 400 : 2000
  • धोकादायक वाहन चालवणे : 1000 : 5000
  • दारू पिऊन वाहन चालवणे : 2000 : 10,000
  • वेगवान वाहन चालवणे : 500 : 5000
  • विनापरवाना वाहन चालवणे : 5000 : 10,000
  • दुचाकीवर दोनपेक्षा जास्त व्यक्ती : 100 : 2000
  • रुग्णवाहिकेसारख्या वाहनांना रस्ता न देणे : 00 : 10,000
  • विमा नसताना वाहन चालवणे : 1000 : 2000
  • अल्पवयीन मुला-मुलींकडून गुन्हा : 00 : 25,000 व तीन वर्षे तुरुंगवास
  • (मालक-पालक दोषी)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com