त्याने चक्क गोळ्या घालून कापला केक (व्हिडिओ)

Meerat
Meerat

मेरठ : उत्तर प्रदेशातील मेरठमध्ये एका युवकाने चक्क गोळ्या घालून वाढदिवसाचा केक कापल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. पोलिसांनी मात्र ही घटना मेरठमध्ये घडली नसल्याचे म्हटले आहे.

मेरठमधील रस्त्यावर एक युवक आपला वाढदिवस मित्रांसह रस्त्यावर केक ठेवून चाकूने कापताना नाहीतर तर गोळीबार करत कापत असल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. या केकवर गुज्जर असे लिहिले आहे. सोशल मीडियात हा व्हिडिओ खूप व्हायरल झाला आहे. या युवकाने अनेक गोळ्या केकवर झाडून आपला वाढदिवस साजरा केला. त्याला त्याचे मित्र चिअर अप करताना दिसत आहेत.

एका युवकाने हा व्हिडिओ मेरठ पोलिसांना टॅग करत सोशल मीडियावर पोस्ट केला. या व्हिडिओवर प्रतिक्रिया देताना मेरठ पोलिसांनी म्हटले आहे, की ही घटना मेरठमध्ये घडलेली नाही. टीक टॉक अॅपमध्ये हा व्हिडिओ बनविल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com