दिल्लीत पार्किंगच्या वादातून एकाची हत्या

वृत्तसंस्था
गुरुवार, 19 एप्रिल 2018

पूर्व दिल्लीतील गौतमपुरी कॉलनी भागात ही घटना रात्री साडेदहाच्या सुमारास घडली. अशोक कुमार या 35 वर्षीय व्यक्तीने त्याची दुचाकी एका रिक्षाच्या मागे पार्क केली होती. तेव्हा नितीन हा कुमारच्या दुचाकीवर बसल्याचे आढळले.

नवी दिल्ली : राजधानी दिल्लीत पार्किंगच्या वादातून एका 35 वर्षीय व्यक्तीची भोकसून हत्या करण्यात आली. ही हत्या तिघा जणांनी केल्याचा प्रकार धक्कादायक प्रकार उघडकीस आला. याप्रकरणात एकाच कुटुंबातील तिघांचा समावेश आहे, अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली.

Parking India

पूर्व दिल्लीतील गौतमपुरी कॉलनी भागात ही घटना रात्री साडेदहाच्या सुमारास घडली. अशोक कुमार या 35 वर्षीय व्यक्तीने त्याची दुचाकी एका रिक्षाच्या मागे पार्क केली होती. तेव्हा नितीन हा कुमारच्या दुचाकीवर बसल्याचे आढळले. त्यानंतर कुमारने नितीनला त्याच्या दुचाकीवरून खाली उतरण्यास सांगितले. मात्र, नितीनने दुचाकीवरून उतरण्यास कुमारला नकार दिला. त्यामुळे या दोघांमध्ये वाद निर्माण झाला. त्यानंतर नितीनने कुमारला त्याची दुचाकी इतरत्र पार्क करण्यास सांगितले, असे मोहम्मद हुसैन याने सांगितले. 

या दोघांमधील वाद विकोपाला गेल्यानंतर कुमारची आई त्याठिकाणी आली. नितीनचे काकाही तेथे आले. नितीनच्या काका अनिलने कुमारच्या आईला एका लाकडी काठीने मारहाण केली. त्यानंतर दोन्ही कुटुंबातील लोक जमा झाले आणि मारहाण सुरु झाली. या मारहाणीत कुमारची भोसकून हत्या करण्यात आली.  

Web Title: Man stabbed to death after fight over parking bike in Delhi Badarpur one died