पत्नीला शरीर संबंधासाठी खूप विनंती केली हो...

वृत्तसंस्था
सोमवार, 15 जुलै 2019

माझ्या पत्नीला शरीर संबंधासाठी खूप विनंती केली. पण, ती सतत नकार देत होती. त्यामुळे मला राग आला अन्...

गोरखपूर: एक वर्षापूर्वी विवाह झालेला. कामानिमित्त बाहेरगावी होतो. घरी आलो अन् पत्नीला शरीरसंबंधाची मागणी केली. पण, विनंती करूनही ती नकारच देत होती. परिस्थिती हाताबाहेर गेली अन् तिचा गळा आवळून खून केला. पत्नीचा खून केल्यानंतर स्वतःचे गुप्तांग कापून काढले, अशी माहिती पतीने दिली.

उत्तरप्रदेशातील सिद्धार्थनगर जिल्ह्यातील पोखर या गावात ही घटना घडली आहे. याबाबतची माहिती समोर आल्यानंतर खळबळ उडाली असून, मुलीच्या वडिलांनी अन्वर हसन (वय 24 या जावयाच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. सिद्धार्थनगरचे पोलिस अधिक्षक धर्मवीर सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, अन्वर हसन याचे एक वर्षापूर्वी विवाह झाला असून, नोकरी निमित्त तो सूरत येथे होता. दोन दिवसांपूर्वी तो घरी आला होता. संध्याकाळी जेवण करून दोघे घरामध्ये झोपले होते. अन्वरने पत्नीकडे शरीरसंबंधाची मागणी केली. परंतु, एकवीस वर्षीय पत्नी त्याला नकार देत होती. यामुळे दोघांमध्ये भांडण झाले. भांडणानंतर अन्वरने पत्नीची गळा दाबून हत्या केली. यानंतर अन्वरने स्वतःचे गुप्तांग कापले. पीडित महिलेचा आवाज ऐकल्यानंतर त्यांच्या शेजारी राहणाऱ्या व्यक्तीने खिडकीतून पाहिल्यानंतर महिला खाली पडलेली दिसली. तर अन्वरच्या अंगावर रक्ताचे डाग दिसत होते. शेजाऱ्यांनी याबाबतची माहिती पोलिसांना कळवली. पोलिस तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी आरोपीला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केलं. यानंतर डॉक्टरांनी त्याला मेडिकल कॉलनेजमध्ये रेफर केलं. तर पीडित महिलेचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. अन्वर विरोधात मुलीच्या वडिलांनी तक्रार दाखल केली असून, त्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

रुग्णालयात उपचार घेत असलेला अन्वर प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हणाला, 'माझ्या पत्नीला शरीर संबंधासाठी खूप विनंती केली. पण, ती सतत नकार देत होती. त्यामुळे मला राग आला आणि मी तिचा गळा आवळून खून केला. त्यानंतर मी माझं गुप्तांग कापले.'


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Man strangles wife to death for refusing sex cuts his own genitals at up