फारुख अब्दुला यांच्या घरात मोटार घुसवण्याचा प्रयत्न

वृत्तसंस्था
शनिवार, 4 ऑगस्ट 2018

जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला यांच्या निवासस्थानासमोर लावलेले बॅरिकेट तोडून एका व्यक्तीनं त्यांच्या घरामध्ये मोटार घुसवण्याचा प्रयत्न केला. यावेळी येथे तैनात असलेल्या सुरक्षा रक्षकांनी मोटारचालकावर गोळीबार केला. या गोळीबारात चालकाचा मृत्यू झाला. मोटारचालकाने एसयूव्ही गाडी भरधाव वेगाने आणून बॅरिकेट तोडले. त्यावेळी त्याला सुरक्षारक्षकांनी त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला, परंतु, तो थांबला नाही, म्हणून सुरक्षरक्षकांनी गोळीबार केला त्यामध्ये त्याचा मृत्यू झाला.

श्रीनगर - जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला यांच्या निवासस्थानासमोर लावलेले बॅरिकेट तोडून एका व्यक्तीनं त्यांच्या घरामध्ये मोटार घुसवण्याचा प्रयत्न केला. यावेळी येथे तैनात असलेल्या सुरक्षा रक्षकांनी मोटारचालकावर गोळीबार केला. या गोळीबारात चालकाचा मृत्यू झाला. मोटारचालकाने एसयूव्ही गाडी भरधाव वेगाने आणून बॅरिकेट तोडले. त्यावेळी त्याला सुरक्षारक्षकांनी त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला, परंतु, तो थांबला नाही, म्हणून सुरक्षरक्षकांनी गोळीबार केला त्यामध्ये त्याचा मृत्यू झाला.

या घटनेनंतर त्या भागातील सुरक्षा वाढवण्यात आली असून, फारूख अब्दुला यांच्या घराचीदेखील सुऱक्षा वाढवण्यात आली आहे. पोलिसांनी या संदर्भात चौकशी सुरू केली आहे. ठार केलेल्या व्यक्तीची अजून ओळख पटली नसून पोलिस पुढील तपास करत आहेत. दहशतवादी कारवायांमुळे फारूक अब्‍दुल्‍ला यांना झेड प्‍लस सुरक्षा दिली गेलेली आहे. 

दरम्यान, फारूक अब्‍दुल्‍ला यांचा मुलगा उमर अब्‍दुल्‍ला यांनी या संदर्भात ट्विट करुन म्हटले आहे की, एका व्‍यक्तिने घरात घुसण्याची हिंमत केली. त्याने समोरच्या दरवाजातून प्रवेश केला होता. सुरक्षारक्षकांनी त्या घुसखोराचा खात्मा केला असून, पोलिस त्याची ओळख पटवण्याचा प्रयत्न करत आहेत.

Web Title: a man strayed into the house of farooq abdullah was gunned down by security