मोदींचा 'डिस्कव्हरी' शो सर्वात वाईट, ब्रिटिश वृत्तपत्राचा रिव्ह्यू!

वृत्तसंस्था
शुक्रवार, 16 ऑगस्ट 2019

डिस्कव्हरी वाहिनीवरील सर्वांत लोकप्रिय शो 'Man vs Wild' चे प्रक्षेपण सोमवारी नुकतेच झाले. या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी सहभागी झाले होते. मात्र, 'Man vs Wild with Bear Grylls and PM Modi' हा सर्वांत वाईट शो असल्याचा रिव्ह्यू ब्रिटिश वृत्तपत्राने दिला आहे.

नवी दिल्ली : डिस्कव्हरी वाहिनीवरील सर्वांत लोकप्रिय शो 'Man vs Wild' चे प्रक्षेपण सोमवारी नुकतेच झाले. या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी सहभागी झाले होते. मात्र, 'Man vs Wild with Bear Grylls and PM Modi' हा सर्वांत वाईट शो असल्याचा रिव्ह्यू ब्रिटिश वृत्तपत्राने दिला आहे.

'Man vs Wild with Bear Grylls and PM Modi' हा कार्यक्रम सोमवारी (ता.12) रात्री 9 वाजता प्रक्षेपण झाले. उत्तराखंडमधील जीम कॉर्बेट राष्ट्रीय अभयारण्यात ग्रेल्स आणि मोदी यांच्या कार्यक्रमाचे चित्रीकरण करण्यात आले. त्यानंतर ब्रिटिश वृत्तपत्र The Guardian ने याबाबत रिव्ह्यू दिला आहे. यामध्ये या कार्यक्रमाला फक्त एक स्टार देण्यात आला. 

बेअर ग्रेल्स यांच्या 'Man vs Wild' या कार्यक्रमात यापूर्वी अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांना आमंत्रित करण्यात आले होते. त्यावेळी ग्रेल यांनी ओबामा यांना अलास्का येथे नेले होते. मात्र, पंतप्रधान मोदींना ग्रेल्स यांनी अलास्का येथे का नेले नाही? तसेच ग्रेल यांनी पंतप्रधान मोदी यांच्या अंतर्वस्त्राचीही (अंडरपँट) विचारणा करत एकप्रकारे चेष्टाच केली होती.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Man vs Wild with Bear Grylls and PM Modi the most tasteless TV ever