लक्ष्यवेधी हल्ल्यानंतरचे सीमा व्यवस्थापन 

surgical strike
surgical strike

भारताने केलेल्या लक्ष्यवेधी हल्ल्यानंतर (सर्जिकल स्ट्राइक) दहशतवाद्यांनी पाकिस्तानच्या सैन्याच्या मदतीने भारतीय जवानाच्या शरीराच्या विटंबनेची बातमी प्रसार माध्यमांमध्ये प्रसिध्द होताच हे असे कसे काय होते असा प्रश्‍न सामान्य वाचकांना पडला. मात्र आपण हे लक्षात घेतले पाहिजे की दहशतवाद्यांची ही कृती नवी नाही. त्यामुळे प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील काम कसे चालते हे समजणे आवश्‍यक आहे.

वास्तविक प्रत्यक्ष नियंत्रण रेषा ही एक मजबूत अशी रेषा नसून केवळ लष्कराव्दारे संरक्षण सिध्दांन्ताव्दारे आपल्यावर शत्रूने आपल्या प्रदेशात हल्ला करू नये या पध्दतीने येथील काही जागांवर चौक्‍या तयार केलेल्या आहेत. त्याचप्रमाणे येथील काही जागांवर फक्त दहा जणांची तुकडी तैनात केली जाते अशा चौक्‍यांना प्रोक्‍टेक्टिव्ह पेट्रोल म्हणतात. त्याचप्रमाणे यातील काही काही ठिकाणांवर गस्ती पथक उभे केले जाते तर काही ठिकाणांवर पाचपेक्षाही कमी माणसांची तुकडी उभी केली जाते. घुसखोरी विरुध्दच्या कुंपणांबद्दल अनेकदा चर्चा झाली असून बऱ्याच ठिकाणी हे कुंपण आपल्या बचावात्मक चौक्‍यांच्या मागे आहे. त्याचप्रमाणे काही ठिकाणी पाकिस्तानच्या ठाण्यांची उंची जास्त असल्यामुळे ते आपल्या चौक्‍यांवर लक्ष ठेवू शकतात हे कटू सत्य आहे. या प्रकारच्या छोट्या ठाण्यांवरील जवानांना रोज हलविले जाते किंवा काही दिवसांच्या अंतराने हलविले जाते.

पूर्वीपेक्षा आता रात्री लक्ष्य देण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या यंत्रणांची क्षमता खूप चांगली आहे. ज्याठिकाणी हे सर्व घटक आहेत तेथील जवानांना संवेदनशील बनविण्याची गरज आहे. काही ठिकाणे, जी कमजोर आहेत अशा ठिकाणांवर पण पाकिस्तान त्याचा फायदा घेऊ शकणार नाही अशा ठिकाणांहून सैन्य हलविले तरी चालण्यासारखी परिस्थिती आहे. या प्रकारच्या अनेक ठिकाणांवर दहशतवादी कब्जा करतात. या ठाण्यांवरील कमांडरना अनेक प्रकारच्या आव्हानांचा सामना करावा लागतो. 

आपला पवित्रा काय असावा -
1) सगळ्यात प्रथम आपण खूपच कमजोर असलेल्या ठिकाणांचा शोध घेऊन तेथे अतिरिक्त सैन्यबळ तैनात करणे गरजेचे आहे. त्याचप्रमाणे 
अडथळा निर्माण करणे आवश्‍यक आहे. यामध्ये कोणतीही चूक होता कामा नये कारण याकडे पाकिस्तानचे लक्ष असून तो याचा फायदा घेण्याची शक्‍यता आहे. 

2) एकूण परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर ऐकण्याच्या ठिकाणांच्या चौक्‍यांची संख्या निश्‍चित करता येऊ शकते. 

3) प्रत्यक्ष नियंत्रण रेषेच्याबाजूला असलेल्या पाकिस्तानी ठिकाणाहून आपल्यावर हल्ला होऊ शकतो हे लक्षात घेऊन आपणही प्रत्युत्तरादाखल योग्य योजना आखली पाहिजे. 

4) अत्यंत कमी वेळात योग्य कारवाई करता येईल अशा प्रकारचे प्रशिक्षण जवानांना दिले पाहिजे. त्याचप्रमाणे या प्रकारच्या तुकड्या सदैव तयार ठेवल्या पाहिजेत. 

आपला प्रतिसाद 
प्रत्युत्तरासांठीची वेळ आणि ठिकाण आम्ही ठरवू ही भूमिका प्रग्लभ आणि पुरेशी स्पष्ट आहे. आपले प्रत्युत्तर योग्य तो विचार करून आणि नियोजनबध्द असेल हे यातून स्पष्ट होते. याशिवाय भारताच्या कृतीमुळे कोणतीही प्रतिक्रिया देण्यापूर्वी पाकिस्तानला विचार करावा लागेल. आपण करीत असलेल्या कृतीला व्युहरचनात्मकदृष्ट्या आणि परिणामकारकरित्या पूर्ण करण्यासाठी सर्व घटकांचा पाठिंबाही गरजेचा आहे. दहशतवाद्यांचा हल्ला झाल्यानंतर लगेचच त्याला तोफांव्दारे प्रत्युत्तर देणे गरजेचे आहे. योग्य हवामान आणि हाताशी पुरेसा वेळ असेल तर पाकिस्तानातील इतर ठिकाणांवरही हल्ला करणे शक्‍य आहे. प्रत्युत्तराला वेळ लागला तर दहशतवाद्यांचीच सरशी झाल्याचा चुकीचा संदेश जाऊ शकतो.

व्युहरचनात्मकदृष्ट्या विचार केला तर परिस्थिती हाताबाहेर गेल्यास त्याचा फटका पाकला सर्वाधिक बसेल. लक्ष्यवेधी हल्ल्यांचे विशिष्ट उद्दीष्ट आपण साध्य केले आहे. व्यूहरचनात्मदृष्ट्या वरचढ राहण्यासाठी अशा हल्ल्याची आवश्‍यकता होती. पाकिस्तानकडून आपल्या जवानांच्या मृतदेहाची विटंबना केली होती. परंतू आपण युध्दाचे नियम आणि आपली सांस्कृतिक परंपरा यांचे उल्लंघन कधीही केले नाही. 

- (अनुवाद) योगेश नाईक

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com