जनतेचा कौल भाजपविरोधात : सचिन पायलट

वृत्तसंस्था
मंगळवार, 11 डिसेंबर 2018

नवी दिल्ली : तीन राज्यातील झालेल्या निवडणुकांचे निकाल समोर येत आहेत. राज्यात झालेले हे मतदान भाजपविरोधात झाले. जनतेचा कौल भाजपविरोधात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी या निवडणुकीत मोठी ताकद लावली होती. मात्र, सध्या काँग्रेस बहुमताच्या दिशेने वाटचाल करत आहे, असे राजस्थान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सचिन पायलट यांनी आज (मंगळवार) सांगितले. 

मध्यप्रदेशात काँग्रेसची बहुमताच्या दिशेने वाटचाल होताना दिसत आहे. त्यानंतर आता राजस्थानातही काँग्रेस आघाडीवर आहे. त्यावर आज सचिन पायलट यांनी सांगितले, की या निवडणुकीत काँग्रेसला मिळत असलेले यश हे पक्षातील कार्यकर्त्यांच्या मेहनतीचे आहे. काँग्रेस सध्या बहुमताच्या दिशेने वाटचाल करत आहे. हा काँग्रेसचा विजय नाहीतर जनतेचा विजय आहे. पुढील तासाभरात हे निकाल स्पष्ट होतील आणि राज्यात आम्ही सरकार स्थापन करू. सध्या आम्ही बिगर काँग्रेस पक्षांच्या संपर्कात आहोत. तसेच जे पक्ष भाजपविरोधात आहे. त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. त्यांच्या संपर्कात असणार आहोत. जनतेचा कौल भाजपविरोधात असल्याचे या निवडणुकीच्या निकालांतून दिसत आहे. 

दरम्यान, गोव्यासारख्या छोट्या राज्यात भाजपने खेळी केली होती. मात्र, आता आम्ही येथे असे होऊ देणार नाही. आम्हाला विश्वास आहे, की तीन राज्यांत काँग्रेसची सत्ता येईल. त्याबाबत उद्या आम्ही बैठक घेणार आहोत. जनतेचे सरकार स्थापन होईल. 

Web Title: Mandate of Peoples Against the BJP says Congress Leader Sachin Pilot