मंदसौर बलात्कार ; नुकसान भरपाई नको, आरोपींना फाशी द्या

वृत्तसंस्था
रविवार, 1 जुलै 2018

पीडितेचे पालक रुग्णालयात मिळणाऱ्या उपचारांबाबत समाधानी आहेत. बालिकेला काही टाकेही घालण्यात आले आहेत. मात्र, सध्या बालिकेच्या प्रकृतीमध्ये सुधारणा होत आहे.

- डॉ. डी. एस. पाल, अधीक्षक, इंदोर एमवाय रुग्णालय

इंदूर : मंदसौरमध्ये एका सात वर्षीय बालिकेवर बलात्कार करण्यात आला. गंभीर जखमी झालेल्या बालिकेवर येथील महाराजा यशवंतराव रुग्णालयात उपचार सुरु करण्यात आले आहेत. यातील आरोपींना कठोर शिक्षा केली जावी, अशी मागणी केली जात असताना आता "आम्हाला नुकसान भरपाई नको, आरोपींना फाशी द्या'', अशी मागणी पीडितेच्या वडिलांनी केली. 

मंदसौर बलात्काराची घटना 27 जूनला समोर आली. पीडित बालिका येथील जवळच्या शाळेत तिसरीच्या वर्गात शिक्षण घेत होती. मिठाईचे आमिष दाखवत तिला अज्ञातस्थळी नेण्यात आले. त्यानंतर इरफान आणि आसिफ या दोघांनी तिच्यावर अमानुषपणे अत्याचार केला. हे प्रकरण समोर आल्यानंतर राज्यभरात संतापाची लाट उसळली. याप्रकरणी दुसरा आरोपी आसिफला 5 जुलैपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.

या घटनेबाबत काँग्रेस नेते ज्योतिरादित्य शिंदे यांनी पोलिस योग्य पद्धतीने तपास करत नसल्याचा आरोप केला. तसेच या घटनेची केंद्रीय अन्वेषण विभागाकडून (सीबीआय) तपास करण्यात यावा, अशी मागणीही केली. 

दरम्यान, पीडितेचे पालक रुग्णालयात मिळणाऱ्या उपचारांबाबत समाधानी आहेत. बालिकेला काही टाकेही घालण्यात आले आहेत. मात्र, सध्या बालिकेच्या प्रकृतीमध्ये सुधारणा होत आहे, असे इंदोर एमवाय रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. डी. एस. पाल यांनी सांगितले.

Web Title: Mandsaur rape Do not compensate hang the accused says parents