मेनका गांधी रुग्णालयात दाखल

वृत्तसंस्था
शनिवार, 3 जून 2017

नवी दिल्ली : केंद्रीय मंत्री मेनका गांधी यांच्या आज छातीमध्ये दुखू लागल्याने त्यांना तातडीने पिलिभीत येथील रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले.

नवी दिल्ली : केंद्रीय मंत्री मेनका गांधी यांच्या आज छातीमध्ये दुखू लागल्याने त्यांना तातडीने पिलिभीत येथील रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले.

सध्या डॉक्‍टरांचे एक पथक त्यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून असून, त्यांना लवकरच पुढील उपचारासाठी विशेष विमानातून दिल्लीला नेण्यात येईल. मेनका गांधी यांना स्टोनचा त्रास असल्याचे डॉक्‍टरांनी सांगितले.

सध्या मेनका यांना अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले आहे. पिलिभीतच्या दौऱ्यावर असताना अचानक त्यांच्या छातीमध्ये दुखू लागल्याने त्यांना तातडीने येथील रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले होते. आपल्या मतदारसंघातील विकासकामांची पाहणी करण्यासाठी त्या नेहमीच पिलिभीतमध्ये येत असतात.

Web Title: maneka gandhi admitted to hospital