विनयभंग प्रकरणी मंगेशी देवस्थानचा पुजारी पोलिसांना शरण 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 21 ऑगस्ट 2018

पणजी (गोवा) : फोंडा तालुक्यातील मंगेशी देवस्थानच्या गाभाऱ्यात दोन वेगवेगळ्या घटनांत दोन तरुणींचा विनयभंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर फरारी असलेला देवस्थानचा पुजारी धनंजय भावे आज फोंडा न्यायालयात शरण आला. फोंडा पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन पोलिस ठाण्यात आणले व चौकशी सुरू केली आहे. 

मूळची गोव्यातील व सध्या अमेरिकेत डॉक्टर अभ्यासक्रमासाठी असलेल्या तरुणीचा संशयित धनंजय भावे याने विनयभंग केला होता. याप्रकरणाची तक्रार तिच्या पालकांनी फोंडा पोलिसांत दाखल केली होती. या तक्रारीनंतर आणखी एका मूळ गोव्यातील मात्र मुंबईत वास्तव्यास असलेल्या तरुणीनेही विनयभंगाची वेगळी तक्रार संशयिताविरुद्ध दाखल केली होती. पोलिसांनी संशयिताचा शोध घेतला मात्र सापडत नव्हता. त्याने अटकपूर्व जामिनासाठी सत्र न्यायालयात तसेच मुंबई उच्च न्यायालयात केलेले अर्ज फेटाळण्यात आले होते. त्यामुळे त्याला पोलिसांना शरण जाण्यावाचून पर्याय उरला नव्हता.

Web Title: mangeshi temples pujari surrender to police for rape