'डी के शिवकुमारांना काँग्रेस अध्यक्ष केले तर...'

वृत्तसंस्था
बुधवार, 10 जुलै 2019

सत्ता नसतानाही डी के शिवकुमारांसारखे धाडसाचे काम करणे सोपे नाही. या कर्नाटक सरकार वाचवण्यासाठी शिवकुमार यांनी केलेले प्रयत्न पाहून काँग्रेसचे माजी नेते आणि माजी मंत्री मणीशंकर अय्यर यांनी डी के शिवकुमारांना काँग्रेस अध्यक्ष केले तर मोदी बाबा चालीस चोर आणि तडीपार गँगचे काही खरे नाही असे म्हटले आहे. डी के शिवकुमार हेच पुढचे काँग्रेस अध्यक्ष बनावेत यासाठी त्यांनी शुभेच्छा देखिल दिल्या आहेत.

नवी दिल्ली: सत्ता नसतानाही डी के शिवकुमारांसारखे धाडसाचे काम करणे सोपे नाही. या कर्नाटक सरकार वाचवण्यासाठी शिवकुमार यांनी केलेले प्रयत्न पाहून काँग्रेसचे माजी नेते आणि माजी मंत्री मणीशंकर अय्यर यांनी डी के शिवकुमारांना काँग्रेस अध्यक्ष केले तर मोदी बाबा चालीस चोर आणि तडीपार गँगचे काही खरे नाही असे म्हटले आहे. डी के शिवकुमार हेच पुढचे काँग्रेस अध्यक्ष बनावेत यासाठी त्यांनी शुभेच्छा देखिल दिल्या आहेत.

मणीशंकर अय्यर यांनी एका वृत्तसंस्थेच्या बातमीचे ट्विट मेन्शन करताना हे ट्विट केले आहे. डी के शिवकुमार यांनीही मी माझ्या आमदार मित्रांना भेटल्याशिवाय वापस जाणार नाही असे सांगितले आहे. यालाच अनुषंगुन मणिशंकर अय्यर यांनी असे ट्विट केले आहे.

दरम्यान, कर्नाटकमधील नाराजीनाट्य अजूनही सुरुच असताना मुंबईतील हॉटेलमध्ये थांबलेल्या बंडखोर आमदारांना भेटण्यासाठी मुंबईत आलेले काँग्रेसचे नेते डीके शिवकुमार हे आले आहेत. मुंबईतील रेनेसाँन्स हॉटेलमध्ये थांबलेल्या कर्नाटकच्या आमदारांनी पोलिसांना पत्र लिहून शिवकुमार यांना भेटण्याची इच्छा नसून, त्यांना हॉटेलच्या परिसरात फिरकू देवू नये अशी विनंती केली आहे. आज सकाळपासून हॉटेल परिसरात मोठा पोलिस बंदोबस्त पाहायला मिळत आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mani Shankar Aiyar Proposes DK Shivakumar As Next Congress President