पुरामुळे 13 कोटी नागरिक विस्थापित होण्याचा धोका

वृत्तसंस्था
रविवार, 16 जुलै 2017

मनिला: चालू शतकाच्या अखेरीपर्यंत भारत, पाकिस्तान तसेच बांगलादेशमधील किनारपट्टीलगतच्या भागात राहणारे तब्बल 13 कोटी नागरिक पुरामुळे विस्थापित होण्याचा धोका एका पाहणी अहवालाद्वारे वर्तविण्यात आला आहे.

मनिला: चालू शतकाच्या अखेरीपर्यंत भारत, पाकिस्तान तसेच बांगलादेशमधील किनारपट्टीलगतच्या भागात राहणारे तब्बल 13 कोटी नागरिक पुरामुळे विस्थापित होण्याचा धोका एका पाहणी अहवालाद्वारे वर्तविण्यात आला आहे.

दरवर्षी निर्माण होणाऱ्या पूरस्थितीचा एशिया-पॅसिफिक प्रांतातील वीस शहरांना मोठा फटका बसणार असल्याचे एशियन डेव्हलपमेंट बॅंक (एडीबी) व पॉट्‌सडम इन्स्टिट्यूट फॉर क्‍लायमेट इम्पॅक्‍ट रिसर्चने (पीआयके) आपल्या अहवालात म्हटले आहे. या शहरांत भारतातील मुंबई, चेन्नई, सुरत, कोलकातासह 13 शहरांचा समावेश आहे. 2050 पर्यंत या शहरांना मोठ्या नुकसानीस सामोरे जावे लागेल, असा इशारा या अहवालात देण्यात आला आहे.

संभाव्य पूरस्थितीचा फटका अंदाजे चार अब्ज नागरिकांना बसेल. तसेच त्याचे परिणाम जागतिक अर्थव्यवस्थेवर झाल्याचेही दिसून येईल, असे अहवालात म्हटले असून, तापमानवाढीमुळे वातावरणात कमालीचे बदल अनुभवास येतील. कृषी, मत्स्य व्यवसाय, व्यापार, शहरी विकास, आरोग्य, तसेच सागरी जैवविविधता यांमध्ये हे बदल घडतील, असे अहवालात नमूद आहे.

दक्षिणेतील तांदूळ उत्पादन घटणार
भारताच्या दक्षिणेकडे असलेल्या राज्यांत होणारे तांदळाचे उत्पादन पुरांमुळे घटेल, असा अंदाज या अहवालात वर्तवला आहे. या उत्पादनात 2030 पर्यंत 5 टक्के, 2050 पर्यंत 14.5 टक्के, तर 2080 पर्यंत 17 टक्के अशी उत्तरोत्तर घसरण होईल. तसेच येथील तापमानात 1 डिग्री अंश सेल्सिअसने वाढ होईल, असेही अहवालात नमूद आहे.

Web Title: manila news rain people and flood