मणिपूरमध्ये बस दरीत कोसळून 10 ठार

वृत्तसंस्था
सोमवार, 27 मार्च 2017

अपघातात 10 जणांचा जागीच मृत्यू झाला. तर 25 जण जखमी असून, त्यांना आसाम रायफल्सच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

इम्फाळ - मणिपूरमधील सेनापती जिल्ह्यात आज (सोमवार) पहाटे प्रवासी बस दरीत कोसळून झालेल्या भीषण अपघातात 10 जण ठार झाले असून, 25 जण जखमी आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, इम्फाळ-दिमापूर राष्ट्रीय महामार्गावर मकान आणि चाकूमाई दरम्यान आज पहाटे साडेतीनच्या सुमारास हा अपघात झाला. ही बस इम्फाळकडे जात होती. चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने बस दरीत कोसळली.

अपघातात 10 जणांचा जागीच मृत्यू झाला. तर 25 जण जखमी असून, त्यांना आसाम रायफल्सच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमींपैकी अनेकांची प्रकृती गंभीर असल्याने मृतांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता आहे.

Web Title: Manipur: 10 killed, 25 injured as bus falls into stream