पोलिस हवालदारच चोरत होता महागड्या गाड्या!

वृत्तसंस्था
गुरुवार, 12 एप्रिल 2018

मोहम्मद फक्रुद्दीन असे या पोलिस हवालदाराचे नाव आहे. चोरलेल्या सर्व गाड्या या महागड्या व ब्रँडेड होत्या. बीएमडब्लू, शेव्हरोलेट क्रूझ, टोयोटा फॉर्चूनर, स्कोडा येती अशा महागड्या गाड्या ही टोळी चोरत व विकत.

नवी दिल्ली : मणिपूरच्या भारतीय राखीव दलातील पोलिस हवालदाराला गाड्यांच्या चोरीच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. दिल्लीतील दक्षिण व पश्चिम भागातून या गाड्या चोरी केल्या जात होत्या. हा पोलिस स्वतःसोबत इतर काही लोकांची टोळी तयार करून या चोऱ्या करीत असे व इंफाळला जाऊन त्या अर्ध्या किंमतीत विकत असे. पोलिसच चोरी करत असल्याच्या या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.  

car stealing

मोहम्मद फक्रुद्दीन असे या पोलिस हवालदाराचे नाव आहे. चोरलेल्या सर्व गाड्या या महागड्या व ब्रँडेड होत्या. बीएमडब्लू, शेव्हरोलेट क्रूझ, टोयोटा फॉर्चूनर, स्कोडा येती अशा महागड्या गाड्या ही टोळी चोरत व विकत. या टोळीने आत्तापर्यांत पन्नासहून अधिक गाड्या चोरल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे.

वाहनचोरीविरोधी पथकाला ही टोळी चोरी करणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी सदर भागात सापळा रचला व या चोरांना पकडले. त्या वेळी त्यांना होंडा सिटी या गाडीची चोरी करताना पकडण्यात आले. यात त्या गुन्हेगार पोलिस हवालदाराचाही समावेश होता. पोलिसांनी टोळीतील लोकांना ताब्यात घेतल्यावर त्यांनी इतर चोरांचा ठावठिकाणा सांगितला. या चोरांना 8 देशी बंदुका व 16 काडतूसांसह ताब्यात घेण्यात आल्याचे पोलिस उपायुक्त रोमिल बनिया यांनी सांगितले. 

गुन्हेगार पोलिस हवालदार फक्रुद्दीन याने, तो पोलिस राखीव दलातील नोकरीतील पगाराबाबत असमाधानी होता. एका नातेवाईकाच्या मदतीने व इतर काही लोकांच्या मदतीने त्याने गाड्या चोरण्यास सुरवात केली असे त्याने सांगितले.

Web Title: Manipur cop turns to stealing luxury vehicles arrested