मणिपूरमध्ये प्रथमच कमळ फुलणार!

टीम ई सकाळ
शनिवार, 11 मार्च 2017

मणिपूर - मागील निवडणुकीत स्पष्ट बहुमताने तब्बल 42 जागा मिळवून सरकार स्थापन करणाऱ्या कॉंग्रेसवर मात करत भारतीय जनता पक्षाचा कमळ फुलविण्याचा प्रयत्न यशस्वी ठरल्याचे पहिल्या काही तासातील कलावरून दिसून येत आहे.

तब्बल बारा वर्षे उपोषण करणाऱ्या "आयर्न लेडी' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या इरोम शर्मिला यांना धक्कादायक पराभवाला सामोरे जावे लागले आहे. 

मणिपूरमध्ये भाजप आणि कॉंग्रेस या प्रमुख पक्षासह स्थानिक पक्षांचे मोठे वर्चस्व आहे. सध्या एकही जागा नसतानाही भाजपने पहिल्या काही तासातील कलानुसार तब्बल 16 जागांवर आघाडी मिळविल्याचे चित्र आहे. तर कॉंग्रेस 12 जागांवर आघाडीवर आहे.

दहशतवादी कृत्यांमुळे मणिपूरमध्ये सैन्याला विशेष हक्क देणारा कायदा (आफस्पा) लागू करण्यात आला आहे. हा कायदा मागे घ्यावा या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्त्या इरोम शर्मिला यांनी 2000 सालापासून उपोषण सुरू केले. त्यानंतर त्यांना नाकातून अन्न देण्यात येत होते.

जगातील सर्वांत जास्त काळ उपोषण करणारी व्यक्ती म्हणून चर्चेत आल्यानंतर त्यांनी उपोषण सोडून निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला. न्याय, समजूतदारपणा, प्रेम आणि शांतता या तत्त्वांच्या आधारे त्यांनी "पीआरजेए' नावाच्या पक्षाची स्थापना केली. मणिपूरचे विद्यमान मुख्यमंत्री ओकराम इबोबी सिंह यांच्याविरूद्ध इरोम शर्मिला यंदा थौबल मतदारसंघातून त्यांनी निवडणूक लढविली. पहिल्या काही कलात शर्मिला आघाडीवर असल्याचे दिसल्या. मात्र, अखेर त्यांना धक्‍कादायक पराभवाला सामोरे जावे लागले. ओकराम इबोबी सिंह हे विजयी ठरले आहेत.

Web Title: Manipur election BJP Amit Shaha Irom Sharmila