भाजपच्या हस्तक्षेपामुळे मणिपूरमधील मंत्र्याचा राजीनामा

वृत्तसंस्था
रविवार, 16 एप्रिल 2017

आपल्या मंत्रालयात हस्तक्षेप होत असल्याचा आरोप करत मणिपूरचे आरोग्यमंत्री एल. जयंतकुमार यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. मात्र, अद्याप त्यांचा राजीनामा स्वीकारलेला नाही.

गुवाहटी (मणिपूर) - आपल्या मंत्रालयात हस्तक्षेप होत असल्याचा आरोप करत मणिपूरचे आरोग्यमंत्री एल. जयंतकुमार यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. मात्र, अद्याप त्यांचा राजीनामा स्वीकारलेला नाही.

देशातील पाच राज्यांच्या विधासभा निवडणुका मागील महिन्यात पार पडल्या. त्यामध्ये मणिपूरचाही समावेश होता. मणिपूरमध्ये भाजपला 21 जागांसह दुसऱ्या क्रमांकावर समाधान मिळवावे लागले. तरीही भारतीय जनता पक्षाने नागालॅंड पीपल्स फ्रंट (एनपीपी), लोक जनशक्ती पार्टी (एलजेपी) आणि एका अपक्षाला सोबत घेऊन सत्ता स्थापन केली. एनपीपीचे जयंतकुमार यांना आरोग्यमंत्रीपद देण्यात आले होते. मात्र आपल्या मंत्रालयात हस्तक्षेप होत असल्याचा आरोप करत त्यांनी राजीनामा दिला आहे. मणिपूरचे मुख्यमंत्री एन. बिरेन सिंह सध्या भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीसाठी भुवनेश्‍वरला आहेत. त्यामुळे अद्याप राजीनाम्यावर विचार होऊ शकलेला नाही.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Manipur Health Minister Resigns Alleging Interference In Work