Manish Kashyap : मनीष कश्यपने पोलिसांना कसा चकमा दिला? शेतातून पाळाला, पण अखेर... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Manish Kashyap Know How Youtuber Reached Bettiah Via Up And Patna who is manish kashyap

Manish Kashyap : मनीष कश्यपने पोलिसांना कसा चकमा दिला? शेतातून पाळाला, पण अखेर…

तामिळनाडूमध्ये बिहारी मजुरांचे फेक व्हिडीओ व्हायरल केल्याच्या आरोप प्रकरणी यूट्यूबर कश्यप फरार होता. मात्र बिहार पोलिसांनी बऱ्याच दिवसांपासून मनीष कश्यप याचा शोध चालवला होता. अनेक जिल्ह्यामध्ये त्याला अटक करण्यासाठी छापे देखील टाकले जात होते.

मात्र पोलिसांना यश मिळत नव्हते. अखेर शनिवारी मनीष कश्यप याने बेतिया येथे जाऊन सरेंडर केलं आहे. पण हा मनीष कष्यप पोलिसांना चकवा कसा देत होता? या बद्दल माहिती समोर आली आहे.

मनीष कश्यप याने शनिवारी बेतिया येथील जगदीशपूर ओपी येथे सरेंडर केलं आहे. यानंतर बिहार पोलिस मनीष कश्यप याला पटणा येथे घेऊन गेले. आता ईओयू त्याची चौकशी करत आहे. ईओयूने सांगितलं की. सहा टीम मनीष कश्यप याला पकडण्यासाठी वेगवेगळ्या राज्यांमध्ये मोहिम राबवत गहोती. बेतिया, मोतिहारी व पटणा यांच्याखेरिज दोन टीम दिल्ली आणि हरियाणा मध्ये छापेमारी करत होत्या.

मनीष कश्यप पोलिसांपासून पळताना यूपीमधून पहिल्यांदा पटणा येथे पोहचला. त्यानंतर बेतियाला पळाला. सांगितलं जात आहे की तो शनिवारी पटणा येथे सरेंडर करण्याच्या तयारीत होता. मात्र जेव्हा त्याला घरावर झालेल्या जप्तीची माहिती मिळाली की तो बेतिया येथे गेला. तेथे त्याने जगदीशपूर ओपी येथे सरेंडर केलं.

विशेष टीमकडून मनीषचा पाठलाग करत त्याला चकिया चेकपोस्टवर इंटरसेप्ट करण्यात आलं, मनीष तेथून रस्ता बदलून पळून गेला.तेव्हा पूर्व चंपारण व पश्चिम चंपारण जिल्ह्यातील पोलिस देखील त्याला शोधत होते.

हेही वाचा - अदानी..हिंडेनबर्ग आणि भविष्य....

बेतिया जाताना वाटेत इओयू तसेच जिल्हा पोलिसांनी अनेक ठिकाणी छापेमारी आणि नाकेबंदी केली होती. जी पाहून देखील पोलिसांच्या भीतीने त्याने अखेर पश्चिम चंपारण जिल्ह्यातील जगदीशपूर ओपी येथे आत्मसमर्पन केलं. गाडी सोडून तो बाईकवरून त्याने शेतांमधून पोलिस स्टेशन गाठलं. यादरम्यान त्याने पोलील ट्रॅक करू शकू नयेत म्हणून स्वतःसोबत मोबाईल देखील ठेवला नव्हता.

कोण आहे मनीष कश्यप?

मनीष कश्यप उर्फ ​​त्रिपुरारी कुमार तिवारी यांने सिव्हिल इंजिनीअरिंग पूर्ण केल्यानंतर दोन वर्षांनी यूट्यूबवरुन पत्रकारिता करण्याचा निर्णय घेतला. यासोबतच 2020 मध्ये मनीषने चणपटिया विधानसभा मतदारसंघातून अपक्ष म्हणून निवडणूक लढवली होती.

मनीष कश्यपच्या बँक खात्यांमध्ये जमा असलेली रक्कम फ्रीज करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फ्रीज झालेल्या सर्व खात्यांमध्ये एकूण 42 लाख 11 हजार 937 रुपये जमा आहेत. मनीषशी जोडलेली चार खाती फ्रीज झाली आहेत.

पोलिसांच्या ट्विटर पोस्टनुसार, मनीषच्या एसबीआय खात्यात 3 लाख 37 हजार 496 रुपये होते. आयडीएफसी बँकेच्या खात्यात ५१ हजार ६९ रुपये आणि एचडीएफसी बँकेच्या खात्यात ३ लाख ३७ हजार ४६३ रुपये जमा आहेत.

प्रकरण काय आहे?

मनीष कश्यपने तामिळनाडूमध्ये काम करणाऱ्या बिहारी मजुरांचा फेक व्हिडीओ व्हायरल केल्याचा आरोप आहे. त्यानंतर पोलिसांनी त्याच्याविरुद्ध एफआयआर नोंदवला आहे. त्यानंतर मनीषचे ट्विटर हँडल अकाऊंट ब्लॉक करण्यात आले. मनीष आणि त्याच्या साथीदाराला पोलिसांनी अटक केल्याचा दावा काही फेक अकाऊंटवरुन केला जात आहे. पण दोघांनाही अटक करण्यात आली नसल्याचे बिहार पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

टॅग्स :YouTube