Manish Sisodia : जेलमध्ये असतांनाच मनिष सिसोदियांना 'ईडी'कडून अटक; अधिकाऱ्यांनी सांगितलं कारण

manish sisodia
manish sisodiasakal

नवी दिल्लीः ईडीने आज दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांना अटक केली. दिल्लीतल्या दारु घोटाळ्यामध्ये सिसोदिया यांचं नाव आलेलं आहे. तीन दिवसांपूर्वी त्यांना सीबीआयने अटक केली होती. आज ईडीने चौकशी केल्यानंतर त्यांना ताब्यात घेतलं.

दिल्लीतल्या तिहार जेलमध्ये सिसोदिया यांची आज कसून चौकशी झाली. सिसोदिया यांना उद्या कोर्टात सादर करणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. यापूर्वी मंगळवारी त्यांची तब्बल सहा तास चौकशी झाली.

manish sisodia
Raj Thackeray : आपली सत्ता येणार, फक्त 'हे' करा; राज ठाकरेंनी कार्यकर्त्यांना दिला सल्ला

सीबीआय कोर्टामध्ये सिसोदिया यांच्या जामिनावर झालेल्या सुनावणीच्या एक दिवस अगोदरच ईडीने त्यांच्यावर अटकेची कारवाई केली आहे. ईडीच्या सूत्रांनी सांगितलं की, सिसोदिया यांच्याविरोधात मनी लाँड्रिंगचे पुरावे मिळाले आहेत. त्यामुळे कायदेशीर प्रक्रियेनुसार कारागृह अधीक्षकांना सांगून आणि कलम १९ पीएमएलएनुसार त्यांना ताब्यात घेण्यात आलं. त्यानंतर त्यांच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली. 'न्यूज १८ हिंदी'ने याबाबतचे वृत्त दिले आहे.

manish sisodia
Maharashtra Budget 2023 : 'त्यांचे' चेहरे बघण्यासारखे झाले होते; मुख्यमंत्र्यांचे विरोधकांवर ताशेरे

२६ फेब्रुवारी रोजी सीबीआयने कथित दारु घोटाळ्यातल्या आरोपांमुळे मनिष सिसोदिया यांना अटक केली होती. ते सध्या न्यायालयीन कोठडीमध्ये आहेत.

दरम्यान, तिहार तुरुगांत न्यायालयीन कोठडीत असताना त्यांनी परवा होळीनिमित्त एक ट्विट केल्यानं खळबळ उडाली होती. यावरुन भाजपनं त्यांच्यावर निशाणा साधला असून सिसोदिया तुरुंगात मोबाईल कसे काय वापरत आहेत? असा सावल करत आकांडतांडव केलं होतं.

सिसोदियांच्या ट्विटला भाजपचं उत्तर

भाजप खासदार प्रवेश वर्मा यांनी सिसोदियांच्या ट्विटला उत्तर देताना म्हटलं की, तुरुंगात सिसोदिया यांच्याकडं फोन आहे का? कारण २६ फेब्रुवारीला सीबीआनं ताब्यात घेतल्यानंतर आत्तापर्यंत सिसोदिया यांनी एकही ट्विट केलं नव्हतं. यानंतर त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन होळीच्या दिवशी संध्याकाळी पहिल्यांदाच ट्विट करण्यात आलं. यामुळं राजकीय गदारोळ माजला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com