Sanjay Raut : सिसोदिया म्हणजे संजय राऊतांचं दिल्ली व्हर्जन; ट्विटरला होतोय ट्रेंड | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sanjay Raut Manish Sisodia
Sanjay Raut : सिसोदिया म्हणजे संजय राऊतांचं दिल्ली व्हर्जन; ट्विटरला होतोय ट्रेंड

Sanjay Raut : सिसोदिया म्हणजे संजय राऊतांचं दिल्ली व्हर्जन; ट्विटरला होतोय ट्रेंड

दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या अटकेची सध्या चर्चा होत आहे. सिसोदिया यांच्यावर झालेल्या आर्थिक गैरव्यवहाराच्या आरोपानंतर सीबीआय, ईडीकडून त्यांची चौकशी सुरू आहे. आज पुन्हा सीबीआयने त्यांना चौकशीसाठी बोलावलं आहे. दरम्यान, आता सिसोदियांना अटक करण्यात येणार असल्याच्या चर्चाही सध्या देशभरात सुरू आहे. मात्र या सगळ्यात नेटकऱ्यांना संजय राऊतांची आठवण येऊ लागली आहे.

हेही वाचा: गुन्हा नोंदवण्यासाठी होता दबाव; सीबीआय अधिकाऱ्याच्या आत्महत्येवर सिसोदिया म्हणाले

ट्विटरला ट्रेंड होणार संजय राऊत यांचं नाव याचं जिवंत उदाहरण आहे. अनेकांनी मनीष सिसोदिया आणि संजय राऊतांची तुलना केली आहे. याचं कारण म्हणजे सीबीआयने चौकशीसाठी ताब्यात घेतल्यानंतर सिसोदिया आपल्या परिवाराला भेटले आहेत. आईला त्यांनी मिठी मारली, तिचा आशीर्वाद घेतला. तसंच सिसोदियांच्या पत्नीने त्यांना ओवाळलंही आहे. आता हेच सगळं संजय राऊतांना चौकशीला नेत असतानाही घडलं होतं. त्याचीच आठवण आता नेटकऱ्यांना आलेली आहे.

हेही वाचा: भाजपच्या ऑपरेशन लोटससाठी CBI-ED एकत्र काम करताहेत - सिसोदिया

मनीष सिसोदियांनी संजय राऊतांची स्टाईल कॉपी केली आहे, असं म्हणत काही जणांनी याची चेष्टा केली आहे तर काही जणांनी त्यांचं कौतुक केलं आहे. तर काही जणांनी यावरुनच त्यांच्या अटकेचा अंदाज वर्तवला आहे. अशाच प्रकारे संजय राऊतही आई आणि पत्नीला भेटून गेले होते आणि त्यानंतर त्यांना थेट अटक झाली आणि आज ते तुरुंगात आहेत. उद्या तुम्हीही तुरुंगात जाल, असं काही जणांनी आपल्या कॉमेंट्समध्ये म्हटलं आहे.

टॅग्स :Sanjay RautManish Sisodia