"...तर भाजप मुख्यालयावर बुलडोझर चालवा"; मनीष सिसोदियांची टीका

Manish Sisodia critisize bjp over Jahangirpuri Demolition drive in delhi
Manish Sisodia critisize bjp over Jahangirpuri Demolition drive in delhi

नवी दिल्ली : दिल्लीचे उपमुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे नेते मनीष सिसोदिया यांनी जहांगीरपुरी बुलडोझर प्रकरणावर पत्रकार परिषद घेऊन भारतीय जनता पक्षावर जोरदार हल्ला चढवला.

सिसोदिया म्हणाले की, भारतीय जनता पक्ष देशात कुठेही शाळा, महाविद्यालये, रोजगार, महागाई कमी करण्याबाबत बोलताना दिसणार नाही. ती फक्त गुंडगिरी आणि लफंगाईबद्दल बोलताना दिसणार आहे. त्यांचे नेते गुंडगिरी करताना दिसतील आणि हुल्लडबाज किंवा गुंड दबंगगिरीचा सन्मान करताना दिसतील. देशाच्या पुढच्या पिढीच्या शिक्षणासाठी त्यांच्याकडे कोणतंही काम नाही, नोकऱ्या देण्यासाठी कसलंच काम नाही.

जिकडे पाहावे तिकडे भारतीय जनता पक्ष हे सर्वत्र गुंडगिरी आणि भाषणबाजीसाठी ओळखली जात आहे. गेल्या 8 वर्षांपासून देशात भाजपची सत्ता आहे. 8 वर्षात त्यांनी शाळा, रुग्णालय, रोजगार, महागाई कमी करण्यासाठी काहीही केले नाही. केवळ मारामारी, भांडणे, मारहाण, महिलांची छेडछाड यालाच प्रोत्साहन दिले जात होते. त्यांना ट्रॅक्टर आणि बसने चिरडण्यास प्रोत्साहन दिले आहे. देशातील ही गुंडगिरी आणि भाषणबाजी थांबवायची असेल, तर भाजपच्या मुख्यालयावर बुलडोझर चालवणे हा सर्वात सोपा मार्ग आहे. असे सिसोदिया म्हणाले.

मनीष सिसोदिया पुढे म्हणाले की, हे लोक रोहिंग्यांबद्दल बोलतात. खूप जबाबदरित्या मला भाजपसमोर दोन प्रश्न मांडायचे आहेत. पहिला गेल्या 8 वर्षात भाजपने देशभरात सर्वाधिक बांगलादेशी आणि रोहिंग्यांना का वसवले? किती बांगलादेशी आणि रोहिंग्या कुठे स्थायिक झाले ते सांगा. त्यांनीच वसवले आहे आणि दंगलीचे नियोजन केले. दुसरा प्रश्न असा की, बेकायदा बांधकामे तोडण्याचे नाटक केले, ते गेल्या 15 वर्षात दिल्ली महानगरपालिकेनेच का बांधले? यासाठी कोणत्या भाजप नेत्याने पैसे खाल्ले होते? ज्या भाजप नेत्यांनी संरक्षण देऊन हे बेकायदेशीर बांधकाम केले त्यांची घरेही पाडण्यात यावीत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com