Manish Tewari मतदार यादी शिवाय कॉंग्रेस पक्ष अध्यक्षांची निवडणूक कशी होणार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

congress

Manish Tewari मतदार यादी शिवाय कॉंग्रेस पक्ष अध्यक्षांची निवडणूक कशी होणार

कॉंग्रेसचे जेष्ठ नेत्यांच्या जी-23 गटाचे सदस्य मनिष तिवारी यांनी कॉंग्रेस अध्यक्ष निवडणूकीवर प्रश्न चिन्ह उपस्थित केला आहे. ते "म्हणाले मतदार यादी शिवाय कॉंग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक निष्पक्ष कशी होईल. त्यानी मागणी केली आहे की निष्पक्ष निवडणूकीसाठी पक्षातील मतदारांचे नावे,पत्ता जाहीर करावेत.

ते म्हणाले कॉंग्रेस पक्ष निवडणूक प्रभारी मधुसूदन मिस्त्री यांच्या कडून जाणून घ्यायच आहे की निवडणूक यादी शिवाय निवडणूक कशी घेवू शकता, आणि ती निवडणूक निष्पक्ष कशी होईल? तिवारी यांनी मिस्त्रींना म्हणाले मतदारांची यादी कॉंग्रेसच्या आधिकृत वेबसाईड वर जाहीर करावी. ते म्हणाले निष्पक्ष निवडणुकीची पहिली अट म्हणजे मतदारांची नावे आणि पत्ते प्रसिद्ध केले पाहिजेत. तिवारी यांनी मंगळवारी ट्विट करूण कॉंग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणूकीवर प्रश्न उपस्थित केले. ते म्हणाले की, यादी सार्वजनिक केली नाही.

त्यावर मिस्त्री यांनी उत्तर दिले आहे ते म्हणाले आमच्या पक्षाच्या कोणत्याही सदस्याला ते तपासायचे असेल तर ते PCC कार्यालयात जाऊन ते तपासू शकतात आणि उमेदवारांना उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर ही संधी नक्कीच दिली जाईल.

अशी निवडणूक क्लब मध्ये पण होत नाही

तिवारी यांनी प्रश्न केला आहे की "मतदार यादी पाहण्यासाठी देशातील PCC कार्यालयात चक्कर मारावे लागतील का? अशी तर क्लबमध्ये पण निवडणूका होत नाहीत. मी पारदर्शक निवडणूकीसाठी मतदारांची यादी जाहीर करावी.