तो ‘यूपीए’ सरकारचा कमकुवतपणा ठरला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

तो ‘यूपीए’ सरकारचा कमकुवतपणा ठरला
तो ‘यूपीए’ सरकारचा कमकुवतपणा ठरला

तो ‘यूपीए’ सरकारचा कमकुवतपणा ठरला

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली : काँग्रेसचे वरिष्ठ नेते मनीष तिवारी यांच्या नव्या पुस्तकामुळे पक्षाचीच कोंडी झाली आहे. देशाची आर्थिक राजधानी असणाऱ्या मुंबईवर २६/११ रोजी झालेल्या हल्ल्यानंतर पाकिस्तानविरोधात तत्कालीन यूपीए सरकारने कोणतीही कारवाई न करणे हा सरकारचा कमकुवतपणा ठरल्याचा दावा त्यांनी केला आहे. तिवारी यांच्या या दाव्यामुळे नवा वाद निर्माण झाला असून भाजपने याच मुद्यावरून काँग्रेस पक्षाला धारेवर धरले आहे.

हेही वाचा: केजरीवालांचा बनवाट व्हिडीओ केला शेअर; संबित पात्रांवर कारवाईचे हायकोर्टाचे आदेश

‘१० फ्लॅशपॉइंट : २० इअर्स- नॅशनल सिक्युरिटी सिच्युएशन दॅट इम्पॅक्ट इंडिया’ नामक पुस्तकामध्ये तिवारी यांनी अनेक मुद्यांना स्पर्श केला आहे. हे पुस्तक अद्याप प्रकाशित झालेले नाही. तिवारी यांनी त्यांच्या पुस्तकामध्ये म्हटले आहे की, ‘‘ मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यानंतर तत्कालीन सरकारने पाकिस्तानविरोधात कठोर कारवाई करायला हवी होती. ती वेळच अशी होती की तेव्हा प्रत्यक्ष कृती करणे गरजेचे होते. पाकिस्तान हा असा देश आहे जो निर्दोष लोकांना ठार मारतो आणि त्याचा त्याला पश्चात्ताप देखील होत नाही.’’

तिवारी यांनी त्यांच्या पुस्तकामध्ये २६/११ रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्याची तुलना अमेरिकेवर ९/११ रोजी झालेल्या हल्ल्याशी केली आहे.

loading image
go to top