डॉ. मनमोहनसिंग यांची राज्यसभेवर बिनविरोध निवड 

डॉ. मनमोहनसिंग यांची राज्यसभेवर बिनविरोध निवड 

जयपूर : माजी पंतप्रधान आणि कॉंग्रेस नेते डॉ. मनमोहनसिंग यांची राजस्थानातून राज्यसभेवर बिनविरोध निवड झाली. या वेळी मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी डॉ. मनमोहनसिंग यांचे अभिनंदन केले आहे. 

राजस्थान विधानसभेचे निवडणूक आणि राज्यसभेचे निवडणूक अधिकारी प्रमिलकुमार माथूर यांनी डॉ. मनमोहनसिंग यांच्या निवडीचे प्रमाणपत्र डॉ. सिंग यांचे निवडणूक प्रचारक महेश जोशी यांना दिले. भाजपचे नेते मदनलाल सैनी यांचे अचानक निधन झाल्याने ही जागा रिक्त झाली होती.

भाजपने या निवडणुकीत डॉ. मनमोहनसिंग यांच्याविरुद्ध कोणीही उमेदवार उभा केला नाही. डॉ. सिंग हे गेल्या तीन दशकांपासून आसाममधून कॉंग्रेसचे खासदार राहिले आहेत. त्यांचा कार्यकाल 14 जून रोजी संपला आहे. आता ते राजस्थानमधून बिनविरोध निवडून आल्याने डॉ. सिंग हे 3 एप्रिल 2024 पर्यंत राज्यसभेचे खासदार राहतील.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com