आपल्या चुका लपवण्यासाठी मोदी करतात काँग्रेसवर टीका - मनमोहन सिंग

वृत्तसंस्था
सोमवार, 7 मे 2018

मोदी सरकारच्या या निर्णयामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला खुप मोठे नुकसान सहन करावे लागले आहे. त्याचबरोबर सुक्ष्म आणि लघुउद्योग पूर्णपणे डबघाईला आले आहेत. म्हणून नोकऱ्यांचे प्रमाण कमी झाले असून बेरोजगारी वाढली आहे.

बंगळूर - मोदी सरकारने खुप मोठ्या चुका केलेल्या आहेत. त्यामध्ये नोटाबंदी आणि घाईघाईत जीएसटी लागू करणे हे निर्णय आहेत. आता ते या निर्णयाचे अपयश लपवण्यासाठी काँग्रेसवर खापर फोडत असल्याची टीका माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी केली आहे. कर्नाटक निवडणुकांचा प्रचार आता शिगेला पोहोचला असून काँग्रेस आणि भाजप हे दोन्ही पक्ष सध्या जोरदार प्रचार करत आहेत. मनमोहन सिंगही आपल्या पक्षासाठी प्रचारात उतरले आहेत त्यावेळी ते बोतल होते.

मोदी सरकारच्या या निर्णयामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला खुप मोठे नुकसान सहन करावे लागले आहे. त्याचबरोबर सुक्ष्म आणि लघुउद्योग पूर्णपणे डबघाईला आले आहेत. म्हणून नोकऱ्यांचे प्रमाण कमी झाले असून बेरोजगारी वाढली आहे. तसेच, मोदी सरकारमुळे लोकांचा बँकिंग क्षेत्रावर असलेल्या विश्वासाला तडा जात आहे, असेही ते यावेळी म्हणाले.

मोदी आपल्या विरोधकांना ज्याप्रमाणे बोलतात तसे आजपर्यंत कुठल्याही पंतप्रधान पदावर राहिलेल्या व्यक्तीने बोललेले नाही, असे बोलणे कुठल्याही पंतप्रधानपदावरील व्यक्तीने शोभा देत नाही. हे देशाच्या राजकारणासाठी चांगले नाही. त्याचबरोबर सिद्धरमैय्या यांच्यामुळे कर्नाटकला गुजरातपेक्षा चांगले  दिवस आले आहेत, असेही मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.

Web Title: Manmohan Singh Said Two Major Blunders Of Modi Govt Are Demonetisation And GST