नोटाबंदीचा निर्णय चुकल्याचे मान्य करा: मनमोहनसिंग

वृत्तसंस्था
मंगळवार, 7 नोव्हेंबर 2017

राजकारण करण्याची वेळ आता संपली आहे. सरकारने आता आपले प्राधान्यक्रम बदलावेत आणि अर्थव्यवस्थेची पुनर्बांधणी करण्यास सुरवात करावी.

नवी दिल्ली : नोटाबंदीचा निर्णय ही घोडचूक असल्याचे असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मान्य करावे आणि अर्थव्यवस्थेची पुनर्बांधणी करावी, असे आवाहन माजी पंतप्रधान आणि ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ डॉ. मनमोहनसिंग यांनी केले.

नोटाबंदीच्या निर्णयाला बुधवारी (ता. 8) एक वर्ष पूर्ण होत असल्यानिमित्ताने त्यांनी आपले मत व्यक्त केले. समाजातील दुर्बल घटक आणि व्यापारी यांना नोटाबंदीचा मोठा फटका बसल्याचा दावा डॉ. सिंग यांनी केला.

"राजकारण करण्याची वेळ आता संपली आहे. सरकारने आता आपले प्राधान्यक्रम बदलावेत आणि अर्थव्यवस्थेची पुनर्बांधणी करण्यास सुरवात करावी,' असे ते म्हणाले. नोटाबंदीचा निर्णय हा एक संस्था म्हणून रिझर्व्ह बॅंकेच्या स्वायतत्तेवर आणि विश्‍वासार्हतेवर हल्ला होता, असा आरोप करत डॉ. सिंग यांनी इतर सरकारी संस्थांचीही अशीच बिकट स्थिती होण्याची भीतीही व्यक्त केली. 

Web Title: Manmohan Singh to visit Gujarat, target GST, note ban