मोदीजी, पंतप्रधानपदाला शोभेल असे वागा- मनमोहन सिंग

मोदीजी, पंतप्रधानपदाला शोभेल असे वागा- मनमोहन सिंग

नवी दिल्ली- पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांच्या पदाला शोभेल असेच वागायला हवे, असा टोला माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी मोदींना लगावला आहे. मोदींनी संयम बाळगायला हवा. त्यांनी आपल्या वागण्यातून एक नवे उदाहरण सर्वांसमोर ठेवले पाहिजे. त्यांची वर्तणूक पंतप्रधानपदाला अनुरुप असायला हवी, असा सल्लाही यावेळी मनमोहनसिंग यांनी मोदींना दिला आहे.

माजी केंद्रीय मंत्री मनीष तिवारी लिखित 'फेबल्स ऑफ फ्रॅक्चर्ड टाइम्स' या पुस्तकाच्या प्रकाशन प्रसंगी ते बोलत होते. पुढे बोलताना ते म्हणाले की, पंतप्रधान म्हणून मी जेव्हा भाजपाशासित राज्यांचा दौरा करत असतो त्यावेळी त्यांच्या मुख्यमंत्र्यांबरोबर माझे चांगले संबंध होते. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान याबाबत स्पष्ट करतील. आघाडी सरकारच्या काळात भाजपाशासित राज्यांबरोबर मी कधीच भेदभाव केला नाही. परंतु, आज मोदीजी तसे वागताना दिसत नसल्याचे त्यांनी यावेळी म्हटले आहे.

पुढे मनमोहन सिंग यांनी मोदींना सल्ला देताना म्हटले आहे की, पंतप्रधानांना माझा सल्ला आहे की, सध्या सार्वजनिक व्यासपीठावर बोलताना प्रचाराची पातळी घसरल्याचे पाहायला मिळत आहेत. ती पातळी पंतप्रधानासोबतच सर्वांनी सांभाळायला हवी.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com