मन की बात : प्रत्येक नागरिक कोरोनाविरुद्धच्या लढाईचा शिपाई

Mann Ki Baat : Fight Against Coronavirus is People-driven Says PM Modi
Mann Ki Baat : Fight Against Coronavirus is People-driven Says PM Modi

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'मन की बात'मधून आज (ता. २६) जनतेशी संवाद साधला. भारतात कोरोनाविरोधाची लढाई जनता लढत आहे. प्रत्येक नागरिक या लढाईचा शिपाई आहे. या लढाईचे नेतृत्व करत आहे. शासन या लढाईत प्रत्येक नागरिकांसोबत आहे. आज पूर्ण देश या लढाईत उतरला आहे. पूर्ण जग या कोरोनाशी लढत असल्याचे मोदी यावेळी म्हणाले.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

भविष्यात कोरोनाविरोधातील लढाईचा वेध घेतला जाईल तेव्हा भारतातील नागरिकांच्या लढाईचा गौरव होईल असेही मोदी म्हणाले. कोरोनाविरोधात प्रत्येक घटकाचं योगदान असल्याचेही यावेळी मोदींनी सांगितले. covidwarriors.gov.in या पोर्टलवर सव्वा कोटी जण जोडले गेले आहेत. डॉक्टर्स, परिचारिका, एनएसएस, एनसीसी स्वयंसेवक याच्याशी जोडले गेले आहेत. तुम्ही देखील याच्याशी जोडले जाऊन कोविड वॉरियर बना असे आवाहनही यावेळी त्यांनी केले. 

Coronavirus : दिलासादायक ! २४ तासात वाढले फक्त ०६ टक्के रुग्ण; १४ मार्चनंतर सर्वात कमी वृद्धीदर

राज्य सरकारांची भूमिका या लढ्यात अत्यंत महत्वाची आहे. समाजाच्या दृष्टीकोनात व्यापक बदल झाला आहे. डॉक्टर, सफाई कर्मचारी, पोलिस व्यवस्थेबद्दल देखील समाजाच्या दृष्टीकोन बदलला आहे. पोलिस कर्मचारी समाजापर्यंत औषध, अन्न पोहोचवत आहेत. हा असा क्षण आहे, ज्यामध्ये जनता पोलिसांशी भावनिकरित्या जोडली गेली आहे. यामुळे सकारात्मक बदल येणार आहे. भारताने स्वत:च्या गरजा पूर्ण करताना सोबतच जगातील देशांमध्ये औषधे पोहोचवली असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

Coronavirus : अमेरिकेत कोरोनाग्रस्तांचा आकडा १० लाखांच्या जवळ तर, मृतांचा आकडा...

अशा परिस्थितीत जनतेने जी संकल्पशक्ती दाखवली यामुळे नवे बदल देशात दिसत आहेत. देशवासियांच्या या लढ्याला मी अभिवादन करतो असेही यावेळी पंतप्रधान म्हटले. अत्यावश्यक सेवांचे देशात वहन होत आहे. यासाठी ३ लाख कि.मी.चे उड्डाण करण्यात आले. रेल्वेकडून लाखो किमी साहित्याचे वहन होत आहे. गरिबांच्या अकाऊंटला थेट पैसे दिले जात आहेत. रेशन दिले जात आहे. सरकारचे कर्मचारी दिवसरात्र यासाठी काम करत असल्याचेही पंतप्रधान मोदी यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com