गोव्याच्या मुख्यमंत्रीपदी मनोहर पर्रीकर कायम

वृत्तसंस्था
रविवार, 23 सप्टेंबर 2018

गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांना प्रकृती अस्वास्थ्यामुळे बराच काळ रुग्णालयात उपचारांसाठी दाखल व्हावे लागत आहे. त्यामुळे राज्याचे प्रशासकीय कामकाज विस्कळीत होत आहे. तसेच विरोधी पक्षातील जोरदार हालचालीमुळे गोव्यातील राजकारण तापले होते. या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी पर्रिकर हेच गोव्याच्या मुख्यमंत्रीपदी कायम राहणार असल्याचे आज स्पष्ट केले आहे. 

नवी दिल्ली- गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांना प्रकृती अस्वास्थ्यामुळे बराच काळ रुग्णालयात उपचारांसाठी दाखल व्हावे लागत आहे. त्यामुळे राज्याचे प्रशासकीय कामकाज विस्कळीत होत आहे. तसेच विरोधी पक्षातील जोरदार हालचालीमुळे गोव्यातील राजकारण तापले होते. या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी पर्रिकर हेच गोव्याच्या मुख्यमंत्रीपदी कायम राहणार असल्याचे आज स्पष्ट केले आहे. 

शहा यांनी ही माहिती ट्विटरवरुन दिली आहे. शहा म्हणाले की, गोव्याचे नेतृत्व मनोहर पर्रिकरच करतील हा निर्णय गोवा भाजपाच्या कोर टीमसोबत चर्चा करुन घेण्यात आला आहे. त्याचबरोबर, गोव्याच्या मंत्रीमंडळात आणि विभागांमध्ये लवकरच फेरबदलही केले जातील, अशा आशयाचे ट्विट त्यांनी केले आहे.
 

दरम्यान, गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर बऱ्याच काळापासून प्रकृती अस्वास्थ्यामुळे रुग्णालयात उपचार घेत आहेत. सध्या त्यांच्यावर दिल्लीतील एम्स रुग्णालयात उपचार सुरु आहेत. गोवा सरकारमधील भाजपासोबत सत्तेत असलेल्या सहकारी पक्षांकडून मुख्यमंत्री बदलासाठी दबाव टाकण्यात येत असल्याचे वृत्त होते. सहकारी पक्षांचे म्हणणे आहे की, पर्रीकर राज्यासाठी वेळ देऊ शकत नाहीत. त्यामुळे त्यांच्या बदली दुसऱ्या व्यक्तीची नियुक्ती करायला हवी.

Web Title: Manohar Parrikar to continue as chief minister of Goa