मनोहर पर्रिकर उपचारासाठी पुन्हा अमेरिकेला रवाना

Manohar Parrikar leaves for America again for treatment
Manohar Parrikar leaves for America again for treatment

पणजी : गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांच्यावर मुंबईतील लीलावती रुग्णालयात उपचार सुरू होते. परंतु, त्यांना पुढील उपचारासाठी अमेरिकेला रवाना करण्यात येणार असल्याची माहिती गोवा विधानसभेचे अध्यक्ष प्रमोद सावंत यांनी दिली.लीलावती रुग्णालयातून उपचार घेऊन पर्रिकर बुधवारी गोव्यात परतणार असल्याचे मुख्यमंत्री कार्यालयातून सांगण्यात आले होते. परंतु, आज ते गोव्यात न परतता पुढील उपचारासाठी तिसऱ्यांदा अमेरिकेत जाणार आहेत.

सावंत म्हणाले, "त्यांच्या उपचारामधील गुंतागुत कमी झाली आहे. त्यांची प्रकृती स्थिर असून काळजी करण्याचे काही कारण नाही. आणखी चांगल्या उपचारासाठी पर्रिकर आज सायंकाळी 5 वाजता अमेरिकेला रवाना होणार आहेत."

अमेरिकेच्या न्यूयॉर्क शहरातील स्लोन केटरींग स्मृती रुग्णालयात 11 दिवस त्यांच्यावर उपचार करण्यात आला होता. गेल्या बुधवारीच ते अमेरिकेहून परतले होतो. तीन महिन्यांपूर्वी स्वादुपिंडाच्या आजारावरील उपचारासाठी पर्रिकर जूनमध्ये अमेरिकेला जाऊन आले होते. त्यानंतर या महिन्यात दुसऱ्यांदा ते उपचारासाठी जात आहेत.

मुख्यमंत्र्यांच्या अनुपस्थितीत कोणालाही त्यांचा पदभार देण्याची आवश्यकता नसून, पर्रिकर लवकरच परत येऊन आपला पदभार स्विकारतील असेही सावंत म्हणाले.

गोव्यातील भाजपचे प्रवक्ते सिद्धार्थ कुंन्कोलिनकर म्हणाले, "मुख्यमंत्र्यांना होणारा अपचनाचा त्रास कमी झाला आहे. त्याचीच माहिती घेण्यासाठी ते अमेरिकेला जात आहेत. तेथील डॉक्टरांचा सल्ला घेऊन ते लवकरच परत येतील. मला विश्वास आहे की त्यांना जास्त वेळ तिथे रहावे लागणार नाही."

पर्रीकरांनी 7 ऑगस्टला नवी दिल्ली येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली होती. या भेटील राज्य सरकारच्या खाण क्षेत्रातील सध्याच्या संकटावर लक्ष देण्याची मागणी त्यांनी पंतप्रधानांना केली होती.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com