वेळ पडल्यास भारत अण्वस्त्राचा वापर करेल: पर्रीकर

वृत्तसंस्था
सोमवार, 14 नोव्हेंबर 2016

नवी दिल्ली : भारत एक जबाबदार देश असून अण्वस्त्रांचा बेजबाबदारपणे वापर केला जाणार नाही. वेळ पडल्यास भारत पहिल्यांदा अण्वस्त्रांचा वापर करू शकतो, असे वक्तव्य संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर यांनी केले आहे.

नवी दिल्ली : भारत एक जबाबदार देश असून अण्वस्त्रांचा बेजबाबदारपणे वापर केला जाणार नाही. वेळ पडल्यास भारत पहिल्यांदा अण्वस्त्रांचा वापर करू शकतो, असे वक्तव्य संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर यांनी केले आहे.

"द न्यू अर्थशास्त्र' या निवृत्त ब्रिगेडियर गुरमित कानवाल यांच्या पुस्तक प्रकाशन समारंभात पर्रीकर बोलत होते. यावेळी बोलताना पर्रीकर म्हणाले, "भारत पहिल्यांदा अण्वस्त्रांचा वापर करणार नाही, असा समज आहे. मात्र मी स्वत:ला अशा बंधनात अडकवून ठेवत नाही.' तसेच "भारत एक जबाबदार देश असून अण्वस्त्राचा बेजबाबदारपणे वापर करणार नाही', असे त्यांनी स्पष्ट केले. "देशावर ज्यावेळी संकट येईल त्यावेळी मी आपल्या धोरणात बदल करण्यासाठी मागेपुढे पाहणार नाही', असा इशाराही त्यांनी दिला. पाकिस्तानबाबत बोलताना पर्रीकर म्हणाले की, "शेजारील राष्ट्र आम्हाला सतत अण्वस्त्र हल्ल्याच्या धमक्‍या देत होता. पण "सर्जिकल स्ट्राईक' झाल्यानंतर त्यांच्या धमक्‍या बंद झाल्या आहेत.'

भारतीय जनता पक्षाने 2014 च्या लोकसभा निवडणुकीच्या जाहीरनाम्यात अण्वस्त्र धोरणाचा फेरविचार करण्यात येईल, असे म्हटले होते. काळाशी सुसंगत असे अण्वस्त्र धोरण स्वीकारले जाईल असेही जाहीरनाम्यात म्हटले होते. पर्रीकर यांच्या वक्तव्यामुळे अण्वस्त्र धोरणात बदल झाला आहे की काय अशी चर्चा सुरू झाली. या पार्श्‍वभूमीवर संरक्षण मंत्रालयाने पर्रीकर यांनी केलेले वक्तव्य वैयक्तिक असल्याचे सांगत अण्वस्त्र धोरणात बदल झालेला नसल्याचे स्पष्ट केले आहे.

Web Title: Manohar Parrikar questions India’s no-first-use nuclear policy,