पर्रीकर पणजीतून निवडणूक लढविणार

वृत्तसंस्था
बुधवार, 10 मे 2017

पर्रीकर यांनी पणजीतून पोटनिवडणूक लढवावी असा पक्षाने निर्णय घेतला आहे. तेथील सध्याचे आमदार सिद्धार्थ कुनकोलीनकर यांनी राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे.

पणजी - गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर हे विधानसभा पोटनिवडणुकीत पणजी मतदारसंघातून निवडणूक लढविणार असल्याचे, भाजप प्रदेशाध्यक्ष विनय तेंडुलकर यांनी सांगितले.

गोव्यात मार्चमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीनंतर माजी संरक्षण मंत्री व राज्यसभेचे सदस्य मनोहर पर्रीकर यांना पुन्हा गोव्याचे मुख्यमंत्री म्हणून नियुक्त करण्यात आले होते. गोव्यात भाजपला साथ देणाऱ्या पक्षांनी पर्रीकर यांनाच केंद्रातून बोलावून मुख्यमंत्री बनविण्याची मागणी केली होती. त्यानंतर त्यांना पुन्हा राज्यात पाठविण्यात आले होते. मुख्यमंत्री पर्रीकर यांना विधानसभेचे सदस्य असणे गरजेचे आहे. त्यामुळे आता ते पणजीतून निवडणूक लढविणार आहेत. यापूर्वी पर्रीकर दक्षिण गोव्यातील कुरकोरेम येथून निवडणूक लढविण्याची चर्चा होती.

प्रदेशाध्यक्ष तेंडुलकर म्हणाले, की पर्रीकर यांनी पणजीतून पोटनिवडणूक लढवावी असा पक्षाने निर्णय घेतला आहे. तेथील सध्याचे आमदार सिद्धार्थ कुनकोलीनकर यांनी राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे.

Web Title: Manohar Parrikar Will Contest Bypoll From Panaji: Goa BJP Chief